पुणे- फेकू मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला . आणि जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढविले . गोरगरीब सामान्य जनता या सरकारच्या कारभाराला हैराण झाली आहे . त्यांच्या पक्षातले साधू आणि साध्वी वादग्रस्त विधान करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे याशिवाय अन्य पक्षातील लोकांना खोट्या आरोपात अडकविण्याची मोहीम राबवून मुस्कटदाबी करू पाहण्याचा प्रयत्न मोडी सरकार करीत असल्याचा आरोप करीत यापुढे या सरकार विरोधात जोरदार आंदोलने करावी लागतील असा इशारा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी नाना पेठ मधील संत कबीर चौकात कॉंग्रेस पक्षाच्या पुणे कॅनटोन्मेन्ट विधानसभा मतदार संघाच्यावतीने आयोजित केलेल्या आंदोलनातून दिला .कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला तर कॉंग्रेस कार्यकर्ते त्याला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ,असेही यावेळी त्यांनी सांगितले
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरुद्ध भाजपचे नेते डॉ. सुब्रमन्यम स्वामी यांनी नेशनल हेरल्ड प्रकरणात भ्रष्ट्राचार झाला अशी तक्रार केली . यांच्या तक्रारीवर न्यायालयाने त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले . केंद्रसरकार सी. बी. आय. , ई. डी. या खात्यांच्या मार्फत अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांवर खोटे आरोप करून त्यांना कुठल्या न कुठल्या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे . या विरोधात आज कॉंग्रेस पक्षाच्या पुणे कॅनटोन्मेन्ट विधानसभा मतदार संघाच्यावतीने जाहीर आंदोलन केले .
या आंदोलनामध्ये पुणे महापालिका विरोधी पक्ष नेते अरविंद शिंदे , नगरसेवक अविनाश बागवे , शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नुरुदिन सोमजी , माजी उपाध्यक्ष संगीता तिवारी , नगरसेविका लता राजगुरू , नगरसेविका लक्ष्मी घोडके , नगरसेवक सुधीर जानजोत , स्थायी समिती माजी अध्यक्ष रशीद शेख , माजी महापौर रजनी त्रिभुवन , कॉंग्रेस सरचिटणीस रमेश अय्यर , वाल्मिक जगताप , विठ्ठल थोरात , युवक अध्यक्ष साहिल केदारी ,सुरेखा खंडागळे , ब्लोक अध्यक्ष असिफ शेख , बेबी युसुफ सय्यद , भगवान धुमाळ , राजेश शिंदे , प्रदीप परदेशी , संजय कवडे , सुजित यादव , सुनील घाडगे , रोहित अवचिते , दयानंद अडागळे , अरुण गायकवाड , क्लेमंट लाजरस , प्रगती कांबळे , मीरा शिंदे व असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते .
या आंदोलनाचे नेतृत्व राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले .भाजपच्या दबावाला कॉंग्रेस पक्ष बळी पडणार नाही . आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या संघ परिवार आणि त्यांचे इतर संघटनेच्या विरुद्ध लढा देतील . देशाच्या स्वांतत्र्यच्या लढाईमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि त्यांच्या मित्र परिवाराने कधीही भाग घेतला नाही . याउलट कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि देशभक्तांनी स्वांतत्र्यच्या लढाईमध्ये भाग घेतला . व अनेकांनी आपले बलिदान दिले . भाजप सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेचा गैरवापर करत आहे . कॉंग्रेस पक्षाने देशाची एकता आणि अखंडतेसाठी झटले . स्वर्गीय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी आपले बलिदान दिले हे देश विसरू शकणार नाही . यापुढे जर मोदी सरकारने कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांवर खोटे आरोप केला तर कॉंग्रेस पक्षांचे कार्यकर्ते उग्र आंदोलन करून त्यास सडेतोड उत्तर देईल .