पुणे :(अनिल चौधरी याजकडून )
कोंढवा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विजय कलाल यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या पुणे जिल्हा चेयरमनपदी या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दविड राज यांनी नुकतीच केली आहे. त्याबाबतचे नियुक्ती पत्र त्याना देण्यात आले आहे.
पुणे शहरामध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाची माहिती सर्व सामान्य माणसांमध्ये पोहोचवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. मानवाधिकार संघ हे नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविते व न्याय मिळून देणारी संघटना आहे. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना जे मुलभूत अधिकार दिलेले आहेत ते पुणे शहरातील नागरिकाना माहिती करून देणे .तसेच कुठेही जर मानव अधिकारांवर अन्याय होत असेल तर तिथे संघटनेच्या माध्यमातून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे महत्वाचे काम हि संघटना करते .नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी त्वरित संपर्क करावा , त्यांच्या अडचणी निश्चितच सोडवल्या जातील असे विजय कलाल यांनी यावेळी सांगितले .त्यांच्या ह्या नियुक्ती बद्दल त्यांचे राजकीय , समाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील तसेच सर्वसामान्य नागरिक त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.