नवीन शहर वसवण्यासाठी 1 हजार कोटी : औरंगाबाद , नाशिकला संधी : पुण्याचं मातेरंं ?

Date:

नवीन शहरे वसवण्याकरिता राज्यांना कामगिरीवर आधारित 8,000 कोटी रुपयांच्या आव्हान निधीची वित्त आयोगाची शिफारस

औरंगाबाद शहराची हरितक्षेत्र विकासासाठी तर नाशिकची शहर सुधार व हरितक्षेत्र विकास स्मार्ट शहर अभियानाअंतर्गत निवड

अजगरासारख्या वाढलेल्या ,वाढत राहणाऱ्या पुण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्षच ..

नवी दिल्ली, 28 जुलै 2021

पंधराव्या वित्त आयोगाने केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात नवीन शहरे वसविण्याकरिता राज्यांना कामगिरीवर आधारित 8,000 कोटी रुपयांच्या आव्हान निधीची शिफारस केली आहे. प्रत्येक प्रस्तावित नवीन शहरासाठी उपलब्ध रक्कम 1000 कोटी रुपये आहे आणि प्रस्तावित योजनेंतर्गत राज्यात फक्त एक नवीन शहर वसू शकते. आयोगाच्या शिफारस कालावधीत आठ राज्यांना आठ नवीन शहरांसाठी या अनुदानाचा लाभ घेता येईल. योजनेसाठी सविस्तर कार्यपद्धती तयार केल्या गेलेल्या नाहीत.

क्षेत्र आधारित विकास हा 25 जून, 2015 रोजी सुरू झालेल्या स्मार्ट सिटी अभियानाचा महत्वाचा धोरणात्मक घटक आहे.  क्षेत्र आधारित विकास पथदर्शी कार्यक्रमात शहर सुधार (रिट्रोफिटिंग), शहर नूतनीकरण (पुनर्विकास) आणि / किंवा शहर विस्तार (हरितक्षेत्र विकास) यांचा समावेश आहे. जानेवारी 2016 ते जून 2018 या कालावधीत झालेल्या स्पर्धेच्या चार फेऱ्यांमध्ये स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यासाठी 100 शहरांची निवड केली गेली आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराची निवड हरितक्षेत्र विकासासाठी तर नाशिक शहराची निवड ही  शहर सुधार व हरितक्षेत्र विकासासाठी स्मार्ट शहर अभियानात झाली आहे. हरितक्षेत्र विकासासाठी निवडलेल्या स्मार्ट सिटीजचा तपशील किंवा एकत्रित पथदर्शी कार्यक्रमांचा तपशील खालीलप्रमाणे आहेः

StateSmart CityABD Component
JharkhandRanchiGreenfield
MaharashtraAurangabadGreenfield
GujaratRajkotGreenfield
Andhra PradeshAmaravatiGreenfield
Madhya PradeshSatnaGreenfield
West BengalNew Town KolkataRetrofitting+Greenfield
MaharashtraNashikRetrofitting+Greenfield
ChhattisgarhAtal NagarRedevelopment+Greenfield

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातील राज्यमंत्री कौशल किशोर यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...