पुणे- ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांच्या पुढाकाराने आणि काही देणगीदारांच्या मदतीने महापालिकेने पुण्याच्या गणेश कला आणि क्रीडा मंच येथे १०० बेड चे कोविड ऑक्सिजन सुविधा केंद्र सुरु करायचे ठरविले आणि ते सुसज्ज देखील झटपट केले खरे ..पण या केंद्राला आता ऑक्सिजन मिळेना आणि ते सुरु होईना अशी स्थिती आहे. येथे डॉक्टर आलेत ,नर्सेस आल्यात , औषधे आलीत सारे काही तयार झालेय ,रुग्णांसाठी नातेवैखी फेऱ्या मारताहेत पण .. तीन दिवसांपासून हे असे शो पीस बनून राहिले आहे .. यास मूळ जो पर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही तोवर येथे ऑक्सिजन आवश्यक असलेले रुग्ण घेता येणार नाहीत आणि त्यांच्या साठी केलेली हि व्यवस्था आता ऑक्सिजन च्या प्रतीक्षेवर आणि पुरवठ्यावरचं अवलंबून असणार आहे.
100 बेडचे कोविड ऑक्सिजन केंद्र सुसज्ज तर झाले ..पण सुरु मात्र होईना … (व्हिडीओ )
Date:

