पुणे -महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ४ च्या वतीने लोहगाव परिसरातील
अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत येऊन सुमारे ६००० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
संबंधित मिळकतदारांना महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम ४७८(१) नुसार नोटीस देण्यात आल्या होत्या.
लोहगाव परिसरातील स.नं. २५३ खेसे पार्क लोहगाव येथील ४ मिळकतदारांनी केलेल्या आरसीसी
पक्क्या स्वरुपाची विनापरवानगी बांधकामे केलेली होती.
सदरची कारवाई झोन क्र. ४ मधील कार्यकारी अभियंता यांच्या नियंत्रणा अंतर्गत पूर्ण करण्यात
आली. सदर कारवाईत १० पोलिस कर्मचारी, १५ बिगारी, १ जेसीबी, १ कटर यांच्या सहाय्याने पूर्ण करण्यात
आली.

