२७. ६२ चे मायलेज देणारी डीझेल कार बाजारात …
नवी दिल्ली- अवघ्या ५ ते ६ लाखात डीझेल ची कार आणि चक्क २७. ६२चे मायलेज देणारी कार आज बाजारात आली आहे . मारुती सुझुकीने आपल्या सेलेरियो या कारचे डिझेल व्हर्जन बुधवारी सादर केले . कंपनीच्या म्हणण्यानुसार, नव्या डिझेल कारचे इंजिन या कॅटेगरीतील सर्वात लहान व खूपच किफायतशीर आहे. हे इंजिन खुद्द मारुतीने फिएट कंपनीसोबत मिळून तयार केले आहे.
कंपनीने दावा केला आहे की, ही नवी कार 27.62 किमी प्रतिलीटर मायलेज देईल. कंपनीचा दावा खरा मानला तर सेलेरियो डिझेल आता भारतातील सर्वात जास्त मायलेज देणारी कार ठरली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त मायलेज देणारी कार म्हणून स्विफ्ट डिझायर डिझेलचे नाव घेतले जाते जिचे मायलेज 26.59km/l आहे. कंपनीने या कारची चार मॉडेल्स आणली आहेत. ज्यांची किंमत 4.65 लाख रूपये पासून ते 5.71 लाख रुपये (एक्स शोरूम प्राईस, दिल्ली) दरम्यान आहे.