मिलिंद अरूण कवडे यांचा म्युझिकल-सस्पेन्स-कॉमेडी “जस्ट गंमत” हा चित्रपट २७ मार्च २०१५ रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. नेहमीच काही तरी वेगळ करण्याचा अट्टहास बाळगत सिनेमा बनवणा-या मिलिंद अरूण कवडे यांनी कायम मनोरंजनासोबतच सामाजिक जाणिवतेचे भान राखत सिनेमे बनवले आहेत. जस्ट गंमत हा सिनेमा त्यापेक्षा वेगळा नाही. दैनंदिन जीवनातील गंमती जंमती सोबतच अंडरकरंट एक मेसेज देणारा हा सिनेमा सर्व वयोगटातील रसिकांना आपलंसं करणारा आहे.
दैनंदिन आयुष्यातील घटना एखाद्यावर मनावर किती गंभीररीत्या आघात करू शकते आणि त्यातून तो कोणत्या टोकाला पोहोचू शकतो, याचं उत्तम उदाहरण यात सादर करण्यात आलं असल्याचं दिग्दर्शक मिलिंद कवडे म्हणाले.जस्ट गंमत चं कथानक दोन मित्रांभोवती फिरतं. दोन जुने मित्र एका दिवशी अचानक भेटतात. सुरूवातीला आपापल्या संसाराबाबत बढाया मारणा-या दोघांच्याही घशाखाली मदिरा उतरल्यावर त्यांच खर दु:ख बाहेर पडतं. दोघेही आपापल्या पत्नीला, त्यांच्या स्वभावाला कंटाळलेले असतात. दोन समदु:खी जीव त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात त्यातून त्यांना एक कल्पना सुचते . ती खूप अचाट पण भयानक असते. पण दोघेही त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात जे वादळ उठतं ते या सिनेमात पाहायला मिळेल.
“तुझ्या विना सुने सुने..” या लव्ह सॉंगच्या जोडीला बेवडा, बेवडा हे आयटम सॉंग आणि सिनेमात दोनदा वाजणारं ” जस्ट गंमत” ला आयटम नंबरचा तडका देणारं आहे. या गीतांवर कोरिऒग्राफर राजेश बिडवे यांनी अचूक कोरिऒग्राफी केली