२४ मार्चला ‘भय’

Date:

बॉलीवूडमधील अनेक दिग्गज गायकांनी आणि संगीतकारांनी आपल्या प्रतिभेची मोहोर मराठी चित्रपटात  उमटवली आहे. त्यांच्या आवाजातील मराठी गीतांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच पार्श्वभूमीवर सचिन कटारनवरे निर्मित ‘भय’ या मराठी सिनेमाद्वारे गीतकार, संगीतकार आणि गायक अशा तीन आघाड्यांवर बॉलीवूड संगीत कलाकार पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘५ जी इंटरनशनल’ निर्मितीसंस्थेच्या ‘भय’ या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाचे दिग्दर्शन राहुल भातणकर यांनी केलंय. २४ मार्चला ‘भय’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

‘रॉकी हँडसम’, ‘इश्क क्लिक’ सारख्या अनेक चित्रपट, मालिका व म्युझिक अल्बमसाठी गीते लिहिणाऱ्या गीतकार शेखर अस्तित्व यांनी ‘भय’ सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीत गीतलेखन केलं असून संगीतकार विक्रम माँटरोज यांनी त्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली आहे. ‘झी म्युझिक’ प्रकाशित केलेल्या ‘भय’च्या ध्वनीफितीत तीन वेगळ्या धाटणीची गीते ऐकायला मिळणार आहेत. लोकप्रिय हिंदी सिनेमातील गीते, मलिकांची शीर्षकगीते, जाहिराती व जिंगल्समधील आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका तुलिका उपाध्याय यांच्यासोबत ‘तनु वेड्स मनू’, ‘जय हो’ फेम ब्रिजेश शांडिल्य यांनी ‘साजना..’ ‘मी आलो..’ या गीतांना स्वरसाज दिला आहे. सुफी व गझल गायकीत ख्याती असणारे अली असलम यांनी यातील ‘चल रे..’ हे भावपूर्ण गीत गायलं आहे.

 

समीर फातर्पेकर यांनी ‘भय’मधील गीतांना पार्श्वसंगीत दिलं असून या गीतांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देताहेत हे जाणून घेण्यासाठी यातील गायक मंडळी खूप उत्सुक आहेत. मराठी चित्रपटासाठी गीत गाण्याचा अनुभव या सगळ्यासाठीच धमाल होता. गाण्याचा अर्थ समजून घेत, शुद्ध उच्चारण करून त्यांनी ही गीते गायल्याचे सांगितले. अजय जोशी यांची सहनिर्मिती आहे. २४ मार्चला प्रदर्शित होत असलेल्या ‘भय’चे बॉलीवूड संगीत प्रेक्षकांचे फुल ऑन मनोरंजन करणार हे निश्चित!

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...