१३० जणांनी प्रत्येकी १.४० कोटी भरले पण बिल्डर घर देईना .. बिल्डर विरोधात प्राणत्याग आंदोलनाचा इशारा

Date:

पुणे-खराडी येथील व्हर्टीलास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील 100 हून अधिक सदनिकाधारकांनी बुधवारी आपल्या हक्काच्या घरासाठी धरणे आंदोलन केले. 95 टक्के रक्कम भरूनही गेल्या दोन वर्षांपासून घरांचा ताबा मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकल्पात तब्बल 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की, जर दहा दिवसांत घराचा ताबा मिळाला नाही, तर आत्मदहन किंवा इमारतीवरून उडी मारण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागेल.

सदनिकाधारकांच्या म्हणण्यानुसार, बिल्डरने घराचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार 95 टक्के रक्कम जबरदस्तीने वसूल केली. मात्र, मुदत उलटून दोन वर्षे झाली तरी प्रकल्प अपूर्णच आहे. सुमारे 130 रहिवाशांनी प्रत्येकी 1.40 कोटी रुपये याप्रमाणे 200 कोटींपेक्षा अधिक रक्कम भरली असूनही प्रकल्पात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही.

या प्रकरणी महारेरा आणि पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. उलट पोलिसांकडून दडपशाही होत असल्याचा दावाही करण्यात आला. हा केवळ निष्काळजीपणा नसून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खाजगी विमा कंपन्यांकडून दावे फेटाळण्याचे प्रमाण अन्यायकारक

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडून संसदेत लक्षवेधी; नियमन...

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर.

संघटन सरचिटणीसपदी प्रविणकुमार बिरादार यांची नियुक्ती मुंबई, दि. १ एप्रिल...

भाजपला मदत करणाऱ्या कॉंग्रेसच्या ७ नगरसेवकांचे निलंबन.प्रदेश कॉंग्रेस आक्रमक पवित्र्यात

मुंबई, दि. १ एप्रिल २०२६.. कॉंग्रेसमध्ये राहून भाजपाला मदत...

आज सोन्याचे दर 2,836 ने वाढून 1.50 लाखांवर

सोन्या-चांदीच्या दरात आज 1 एप्रिल रोजी वाढ झाली आहे....