मंगळवार पेठमधील पारगे चौकात हिंदू साम्राज्य दिनानिमित शिव राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची भव्य पालखी काढण्यात आली . तसेच , राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प . चारुदत्त आफळे बुआ, नगरसेवक बाळा शेडगे , दिलीप बहिरट , शंकर शिवले , दत्ता जाधव , विशाल धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे संयोजन सागर गायकवाड , अनुप जाधव , गणेश यादव , महेश खरात , तुषार दिवटे , महेश नवगिरे , रोहित पवार , कुमार पैनग्लर , शेखर गायकवाड , चेतन जगताप , शुभम वर्दे , सुरज दिवटे , निखिल शिंदे , मिलिंद दरेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले .
अपोलो चौकापासून , खडीचे मैदान , महाराजा लॉज , सदानंद हॉटेलमार्गे पालखी काढण्यात आली .