हिंदी अभिनेते सुशांत सिंग यांच्या शुभहस्ते देशभक्तीपर “प्रतिज्ञा” चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.
मुंबई- चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब असते, आपल्या आजुबाजुला समाजात घडत असणाऱ्या घटना चित्रपटात परिवर्तित होत असतात, असाच देशभक्तीपर आधारित विषय घेवून येत आहेत दिग्दर्शक माणिक. निर्मल प्रॉडक्शन निर्मितीसंस्थे अंतर्गत एम. केशव निर्मित “प्रतिज्ञा” चित्रपटाचा मुहूर्त नुकताच प्रसिद्ध हिंदी अभिनेते सुशांत सिंग यांच्या शुभहस्ते मुंबईत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
सिया पाटील, उषा नाडकर्णी, मिनाक्षी जोशी, अशोक शिंदे, अनु पाटील, अनंत जोग, प्रदीप पटवर्धन, अमित शिंगटे आणि प्रशांत मुंढे (बाल कलाकार) अभिनित या चित्रपटाची पटकथा- सवांद- गीते – अनिल नलावडे यांचे असून संगीत धीरज सेन यांचे आहे.
देशात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना कुठे ना कुठे आपल्या देशातील कुणीतरी मदत करत असतात अशांना आपण भारतीयच धडा शिकवू शकतो असे आव्हानात्मक कथाबीज असलेल्या या चित्रपटाच्या चित्रिकरणाला लवकरच सुरुवात होत असून मराठीत प्रथमच इतका धाडसी विषय हाताळल्यामुळे सिनेमाची आधीच जोरदार चर्चा सुरु आहे.