फॅनीच्या शोधात संपूर्ण चित्रपटभर भटकणाऱ्या नासिरूद्दीन शाह यांची फॅनी क्लायमेक्ससाठी का होईना आपल्या समोर
आली आणि सगळ्यांना वेड लावून गेली. हीच फॅनी आता ‘दी सायलेंस’च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे .
‘दी सायलेंस’ चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाच्या जोरावर हा चित्रपट फिल्म फेस्टिवल्सच्या पडद्यावर
सातत्याने झळकतोय. या सगळ्याबरोबरच चित्रपटातल्या कलाकारांचा उत्तम अभिनय ही याची जमेची बाजू आहे.
यातलाच महत्त्वाचा पैलू म्हणजे महाराष्ट्राची कन्या अंजली पाटील. आपल्या वयापेक्षा जास्त उंचीची भूमिका अगदी
सहजतेने साकारण्यात अंजलीला यश आले आहे.
दिल्ली – इन अ डे या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अंजली पाटील हिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या
जोरावर खूप कमी वेळात सिनेजगतात स्वत: च एक वेगळं अस्तित्व निर्माण केले आहे.
नक्षलवादावर आधारीत चक्रव्यूह या सिनेमातल्या भूमिकेसाठी बी-टाऊनमध्ये तिच्या भूमिकेची वाह! वाह! झाली होती.
विथ यू विदाऊट यू या चित्रपटासाठी तिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सिल्वर पिकॉक
पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. हिंदी, इंग्रजी बरोबरच काही प्रादेशिक चित्रपटांमध्येही अंजलीने अभिनय केला आहे