छोट्या पडद्यावरचा मानाचा समजला जाणारा ‘झी टॉकीज कॅामेडी अवॉर्ड्स सोहळा’ नुकताच संपन्न झाला.कॉमेडी अवॉर्ड्स म्हणजे विनोदाचा तडका असणारच आणि या सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील कलाकारांच्या धमाकेदारसादरीकरणाने उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले. या सोहळ्यावर मोहोर उमटवली ती ‘पोश्टर बॉईज’ चित्रपटाने.हृषिकेश जोशी सर्वोत्कृष्ट नायक(पोश्टर बॉईज ) तर सर्वोत्कृष्ट नायिका सोनाली कुलकर्णी(अगं बाई अरेच्चा २) ठरली.वैभव मांगले यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (टाईमपास २) तर नेहा जोशी हिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री(पोश्टर बॉईज) पुरस्कार पटकावला.समीर पाटीलयांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा (पोश्टर बॉईज) पुरस्कार मिळवलातर समीर पाटील, चारुदत्त भागवत (‘पोश्टर बॉईज’) यांना सर्वोत्तम लेखनासाठी गौरवण्यात आले.
नाटक विभागातील पुरस्कारांमध्ये ‘ऑल द बेस्ट २’ नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान देवेंद्र पेम यांनी ‘ऑल द बेस्ट २’साठी पटकावला.सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार‘गोष्ट तशी गमतीची’या नाटकासाठी मंगेश कदमयांना प्रदान करण्यात आला. तरसर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लीना भागवत यांना‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकासाठी देण्यात आला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता भूषण कडू (सर्किट हाऊस) तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पूजा नायक(पहिलं पहिलं) ठरली. विशेष लक्षवेधी अभिनेत्याचा ज्युरी पुरस्कर मयुरेश पेमला(ऑल द बेस्ट २)मिळाला.
पुनरूज्जीवित नाटकाच्या पुरस्कारांमध्ये ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकाने बाजी मारली. याच नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून भरत जाधव तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाकरिता केदार शिंदे याची निवड करण्यात आली. प्रसिद्ध लेखक गंगाराम गवाणकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष पुरस्कारांमध्ये हास्यकवी रामदास फुटाणेव लावणीसाठी योगदान देणाऱ्या कांताबाई सातारकर यांचा गौरव करण्यात आला.
हास्य-विनोदाचा जल्लोष असलेल्या या रंगतदार सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री व मकरंद अनासपुरेयांनीकेले.या दोघांच्या भन्नाट निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढतच गेली. नेहा पेंडसे, मानसी नाईकव पूजा सावंत या अभिनेत्रींच्या दिलखेचक नृत्यविष्काराने सर्वांची मने जिंकली.मयुरेश पेम वकोरिओग्राफर सॅड्रीकच्या नृत्याच्या जलव्याने चांगली रंगत आणली. सचिन पिळगांवकर यांनी श्रुती मराठे, संस्कृती बालगुडेयांच्या साथीने किशोर कुमार यांच्या लोकप्रिय गाण्यांवर ठेका धरतया सोहळ्यात अनोखे रंग भरले.विजय पाटकर व आरती सोळंकी धमाल गाण्यावर बेधुंद नाचले. तरसंतोष पवार, कमलाकर सातपुते, समीर चौघुले, विशाखा सुभेदार, हेमांगी कवी,सिद्धार्थ जाधवयांच्या बहारदार स्किटसने उपस्थितांना मनसोक्त हसवले.
धम्माल विनोदी परफॉर्मन्सेस, आकर्षक नृत्याविष्कार आणि दिग्गजांच्या उपस्थितीने सजलेला‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा पुरस्कार सोहळा रविवारी १२ जुलैलासायं. ६.३० वा.‘झी टॉकीज’वर प्रक्षेपित होणार आहे.