अण्णांनी टेकला माथा ‘धन्य धन्य देश माझा ‘
आता बस्स … जनहितासाठी खूप लढलो पण जनहित काही दिसेना ……
पुणे- कलियुग म्हणतात ते हेच बघा … अण्णा हजारेंसारखे थकले , म्हणाले खूप केले ,खूप वर्षे लढलो ,पण लोकांना काही फायदा मिळत नाही … तेव्हा आता बस्स … एकीकडे दिल्लीत लढलेले केजरीवाल यांच्या पदरी पडलेली मानहानी , अवमान पाहता त्यांनाही असा प्रश्न पडला असेलच कशासाठी -कुणासाठी केला होता एवढा अट्टाहास ? त्यांना बहुमत न देताच जनतेने त्यांनाच दोषी धरले , त्यांनी कॉंग्रेसचा पाठींबा घेवून सरकार हि स्थापन केले होते पण यातून आपण काही जनहित साधू शकणार नाही हे लक्षात येताच त्यांनी सत्ता त्याग केला , हि वास्तवता विसरून त्यांना लोकसभेत भयाण अपमान पचवावा लागला . आणि आता अन्ना हजारे यांनी काळ व्यक्त केलेली उद्विग्नता या गोष्टी कलियुगाने सत्यावर कधीच मात केल्याचे स्पष्ट करीत नाहीत काय ?
काल ‘भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या बरखास्त केलेल्या समित्यांची सध्या तरी पुन्हा स्थापना करण्यात येणार नाही,’ असे स्पष्ट करतानाच ‘एवढी वर्षे आंदोलने करूनही खऱ्या अर्थाने लोकांना फायदा मिळत नसेल तर आता बस्स… झाले एवढे काम पुरे झाले,’ अशी उद्विग्नता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. ‘केवळ पदांसाठी काम करू नका, अशा कार्यकर्त्यांनी माझे नावही वापरू नये,’ असेही त्यांनी संतापून सांगितले . (जणू आभाळच फाटले -ठिगळ तरी कुठे कुठे लावणार ? अशीच उद्विग्नता त्यामागे असावी )
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या शिबिराचा समारोप राळेगणसिद्धी येथे झाला. त्यावेळी हजारे बोलत बोलत होते. या शिबिरात बोलताना अनेक कार्यकर्त्यांनी बरखास्त केलेल्या समित्या पुन्हा स्थापन करून तालुकानिहाय पदाधिकारी नियुक्त करण्याची सूचना मांडली. हजारे यांनी फेटाळली. ते म्हणाले, ‘माझे नाव वापरणाऱ्यांचा आता तिटकारा आला आहे. समित्या बरखास्त केल्या तरी माजी पदाधिकारी म्हणून अनेक जण मिरवत आहेत. माझे वय आता ७५ वर्षे आहे. आतपर्यंत ३७ वेळा विविध कारणांसाठी राज्याचा दौरा केला. संघटन आणि कायद्याचा प्रचारासाठी फिरलो. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही, असे दिसते. कायदा करण्यासाठी आंदोलन, कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आंदोलन, त्याचा प्रचार करण्यासाठी आंदोलन, त्याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन, अशी आंदोलने तरी कशाकशासाठी करायची, असा प्रश्न आज उभा राहतो आहे. त्यामुळे एकवेळ असे वाटते की, आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात आपण जनतेसाठी जे केले, ते पुरे झाले.’
कार्यकर्त्यांना ते म्हणाले, ‘पुढील तीन महिने कोणतेही पद न घेता काम करा. माहितीचा आधिकार, ग्रामसभेला अधिकार, दप्तर दिरंगाई विरोधी कायदा व दारुबंदी कायदा यांचा प्रसार करा, तीन महिन्यानंतर स्वतःच्या आपल्या कामाचे मूल्यमापन करा, त्यानंतर आपण समित्यांचा निर्णय घेऊ.’ ३४ जिल्ह्यांतील आलेले कायकर्ते या शिबिरात सहभागी झाले होते.
अण्णांनी माहिती अधिकार कायदा आणून क्रांती केलीच ,एकेक भ्रष्टाचाराविरुद्ध यशस्वी लढा दिला ,पण या गोष्टी हि देशाला सुराज्याकडे नेण्यास पूर्णतः सबळ ठरू शकत नाहीत असे दिसल्यावर जनलोकपाल कायद्याची लढाई त्यांनी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांना बरोबर घेवून आरंभली
अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या जनलोकपाल कायद्याच्या देशव्यापी आंदोलनाने देश ढवळून निघाला होता एक आशेचा किरण दिसू लागला होता , देशात चैतन्य सळसळू लागले होते
बऱ्याच वर्षांनी; पहिल्यांदाच, चांगल्या कामासाठी देशभरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं दिसलं . देशातली तरुणाई मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरली. जात-धर्म-भाषा-प्रांत-राजकीय पक्ष अशी बंधनं झुगारुन देशाच्या सर्व भागात लोक लाखोंच्या संख्येनं अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सामिल झाल्याचं चित्र दिसलं . पण हे सारे क्षणभंगुर ठरले , एक स्वप्न पडून विरघळून जाव असे झाले , केजरीवालांचा एकाकी लढा हि दमछाक झालेला दिसला जणू कलियुगाने आपला करिष्मा त्यांना दाखविला . ब्रिटिशांनी १५० वर्षे भारतावर राज्य केले तेव्हाही त्यांच्या दिमतीला सैन्यात -सत्तेत भारतीय नागरिक होतेच कि … इथे सत्ता कोणाची हि येवू द्यात त्या सत्तेचा उदोउदो करणारे आज हि आहेत काल हि होते … तरीही केजरीवाल तसेच अन्नांसारखे ‘गांधी ‘ निर्माण होतात हेच या देशाचे वैशिष्ट्य मानावे लागेल
अण्णा -केजरीवाल यांनी उभारलेल्या लढ्याने देशातील बॉलीवूड च्या बड्या हस्तींनाही आकर्षित केले होते त्यापैकी कित्येकांनी या लढ्यात आपला सहभाग नोंदविण्याचा प्रयत्नही केला … पण आता … ? कुठे आहे तो कारवा ? कुठे आहे ती आशा ? कुठे गेले ते दिवस – एक दिवास्वप्न ठरले सारे जे संपूर्ण भारताला पडलेले स्वप्न होते . ते साकार करण्यासाठी आता लढणारा जणू कोणी न उरला अशी स्थिती झाली आहे
—————————————-
फ्ल्याश ब्याक – विचार करायला लावणारी हि छायाचित्रे
—————————————