दत्तवाडीमधील विठ्ठल हनमघर फाऊडेशनच्यावतीने स्व. विठ्ठल हनमघर यांच्या चतुर्थ स्मरणार्थ दिनानिमित ” भव्य रक्तदान शिबिराचे ” आयोजन करण्यात आले होते .या रक्तदान शिबिरात ४३८ पिशव्या रक्तसंकलित करण्यात आले . दत्तवाडीमधील एस. एस. अग्रवाल शाळेमध्ये झालेल्या शिबिराचे उद्घाटन महापालिका सभागृह नेते शंकर उर्फ बंडू केमसे यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी खासदार वंदना चव्हाण ,आमदार जयदेवराव गायकवाड , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे , विठ्ठल हनमघर फाऊडेशनचे कार्याध्यक्ष नगरसेवक विनायक हनमघर , अध्यक्ष आनंद रिठे , नगरसेवक विकास दांगट , राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर , गणेश घोष , धीरज घाटे , दयानंद इरकल , नगरसेवक दिनेश धाडवे ,दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीषक श्रीधर जाधव , पोलिस निरीषक स्मिता जाधव, पोलिस निरीषक दत्ताजीराव मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते .
या रक्तदान शिबिरात दिनानाथ मंगेशकर रुग्णालय , ससून सर्वोपचार रुग्णालय , पी. एस. आय . ब्लड बँक या रक्तपेढीनी रक्त संकलित करण्यात आले . या रक्तदान शिबिराचे आयोजन विठ्ठल हनमघर फाऊडेशनचे कार्याध्यक्ष नगरसेवक विनायक हनमघर व विठ्ठल हनमघर फाऊडेशनचे अध्यक्ष आनंद रिठे यांनी केले .