पुणे कॅम्प भागातील इस्ट स्ट्रीटवरील स्व. इंदिरा गांधी चौकाचे सुशोभिकरण करण्याबाबतचे निवेदन पुणे कॅंटोन्मेंट ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विजय जाधव यांनी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार यांना दिले .
स्व. इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोंबर २०१४ रोजी पुण्यतिथी आहे तसेच १९ नोव्हेंबर २०१४ रोजी जयंती आहे . पुणे कॅम्प भागातील इस्ट स्ट्रीटवरील राणी लक्ष्मीबाई उद्यानाशेजारील स्व. इंदिरा गांधी चौक आहे . या चौकात इंदिरा गांधींचा नामफलक देखील नाही , त्यासाठी या चौकाची सजावट आणि रंगरंगोटी करण्यात यावी हि विनंती करण्यात येत आहे . असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे .