पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश यंदा ‘स्वानंदलोका’त विराजमान होणार आहे. मोरगाव येथे ‘स्वानंदलोक’ प्रतीकात्मक रूपात असून त्यावरूनच हा देखावा साकारण्यात आल्याचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सांगितले.गुरुवार दि.१७ सप्टेंबर २०१५,वेळ :- सकाळी १०:३० वा.
प.पुज्य.श्री. विजयकाका पोफळी महाराज (वाशीम) यांच्या हस्ते वेगळ्याउत्सव मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना विधीपूर्वक होणार आहे.

‘स्वानंदलोक’ कलादिग्दर्शन शिल्पकार विवेक खटावकर यांनी केले आहे. यवतमाळ येथील गाणपत्य स्वानंद पुंड शास्त्री आणि मोरगावच्या बालविनायक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही सजावट करण्यात आली आहे.
गुरुवार दि.१७ सप्टेंबर २०१५ वेळ :- सायं. ७.०० वाजताविद्युत रोषणाईचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे.दगडूशेठ हलवाई गणेशाची मूर्ती ज्या स्वानंदलोकात विराजमान होणार आहे, त्या देखाव्याची उंची ९० फूट आहे. सातमजली सजावट असून असंख्य कळसांची जोड देण्यात आली आहे. विविध रंगांमध्ये सव्वा लाख दिव्यांच्या लखलखाटात श्रींची मूर्ती उजळून निघणार आहे.