समृद्ध जीवन फाऊडेशनवतीने
स्वर्गीय मंगला किसन मोतेवार यांच्या स्मरणार्थ
गरीब . गरजू , होतकरू , अनाथ मुलीसाठी ” कन्या धन योजना ” सुरु
समृद्ध जीवन फाऊडेशनवतीने स्वर्गीय मंगला किसन मोतेवार यांच्या स्मरणार्थ ” कन्या धन योजना ” सुरु करण्यात आली . कन्या धन योजना चंद्रकांत वायकर यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आली .
बिबवेवाडीमधील प्रियदर्शिनी शिक्षण संस्थेमधील गरीब . गरजू , होतकरू , अनाथ मुलीचे शिक्षण चांगल्या पध्दतीने होऊन त्याचे शिक्षण उच्च पदवीधर होण्यासाठी आम्ही पहिलीमधील मुलींना प्रत्येकी २५० रुपये महिना असे आम्ही भरणार आहोत . दहा मुलींसाठी महिन्यास अडीच हजार रुपये भरणार आहोत . बारावी पास झाल्यानंतर प्रत्येकीस एक लाख रुपये देण्यात येणार आहे . खऱ्या अर्थाने गरिबाचे शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून ते त्या मुलींचे भविष्य घडवू शकतात . हा संकल्प आज आम्ही समृध्द जीवन फाऊडेशनचे अध्यक्ष डॉ. महेश मोतेवार यांच्या आशीर्वादाने सुरु करत आहे . या कार्यक्रमास आमचे पालक म्हणून सौ. वर्षा वायकर , वैशाली जाधव , रंजना राठोड , ज्योती गायकवाड , तुळसा कदम , मोना राठोड ,राजेश चव्हाण , शोभा बढेकर तसेच , प्रियदर्शिनी शिक्षण संस्थेचे संस्थापक शशिकला कुंभार , महेश कुंभार तसेच , सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब रासकर , दादासाहेब सांगळे उपस्थित होते .