स्वराज अभियान पुणे महानगर जिल्हा अध्यक्षपदी संदेश दिवेकर यांची नियुक्ती करण्यात आली , या नियुक्तीचे पत्र स्वराज अभियान महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे व सरचिटणीस संजीव साने यांनी दिले . स्वराज अभियान पुणे महानगर जिल्हा कार्यकर्त्यांच्या बैठकीत हि नियुक्ती करण्यात आली .
संदेश दिवेकर हे पुणे शहरात सामाजिक चळवळीत क्रियाशील कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत . त्यांनी अण्णा हजारे यांनी जनलोकपाल पुकारलेल्या आंदोलन सक्रिय सहभागी झाले होते . त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीच्या पुणे शहरात संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे .
या कार्यकारिणी बैठकीस स्वराज अभियान राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मारुती भापकर , राज्य खजिनदार कॅप्टन दास , राज्यकारिणी सदस्य इब्राहीम खान उपस्थित होते .
या नियुक्तीनंतर बैठकीत पुणे महानगर- जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली , स्वराज अभियानचे सयोजंक योगेंद्र यादव , प्रशांत भूषण यांच्या विचाराने स्वराज अभियानचे पुणे महानगर जिल्ह्यामध्ये काम करणार असल्याचे संदेश दिवेकर यांनी नियुक्तीनंतर सांगितले .
सरचिटणीस – बाळ पाटील , उपाध्यक्ष – निलेश डांबरे , खजिनदार – सेन्थिल अय्यर , चिटणीस – हुसेन शेख , प्रसिध्दप्रमुख – अभिषेक निसाळ आदीची नियुक्ती करण्यात आली .


