“स्वरतीर्थ बाबूजी” हा स्व श्री.सुधीर फडके यांच्या गाण्यांचा कार्यक्रम संपन्न
पुणे-सर्वोत्कर्ष पब्लिक च्यारीटेबल ट्रस्ट आयोजित “स्वरतीर्थ बाबूजी” हा स्व श्री.सुधीर फडके यांच्या कार्यक्रम सौ. भाग्यश्री मुळे व श्री. राजेश दातार या गायकांनी सदर केला. या सुखांनो या , प्रथम तुज पाहता , स्वर आले दुरुनी , कानडा राजा पंढरीचा , काहो धरिला मज वर राग , निजरूप दाखवा हो , बलसागर भारत होवो अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करण्यात आली.प्रथम तुज पाहता आणि कानडा राजा पंढरीचा या राजेश दातार यांनी गायलेल्या गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली,एस एम जोशी सभागृह संपूर्णपणे भरलेले होते व काही रसिकांनी उभे राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. श्री मिलिंद गुणे,अभिजित जायदे व पराग जोशी यांनी समर्पक साथ संगत केली व व्यंकटेश गरुड यांनी निर्मिती व्यवस्था चोख बजावली.
उत्तरार्धात बाबूंजींच्या किस्स्यांच्यावर व गाण्यांवर ध्वनिफिती दाखवण्यात आल्या त्यालाही रसिकांनी भरभरून दाद दिली,कार्यक्रमाची संकल्पना श्री श्रीपाद उम्ब्रेकर यांची होती व बाबूंजींची गायकी रसिकांपर्यंत त्यांनी उत्तमरित्या पोहोंचवली. सर्वोत्कर्ष पब्लिक च्यारीटेबल ट्रस्टच्या उपक्रमांना रसिकांची भरभरून दाद मिळत असल्याने ट्रस्ट मार्फत असेच नवेनवे उपक्रम राबवण्याचे आश्वासन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजेश दातार यांनी दिले.