स्वयंसेवी संस्थांनी उद्योजकीय दृष्टीकोन वाढवावा : विनोद पारटकर
पुणे :
स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रात विधायक बदल घडवून आणण्यासाठी तेथील उद्योजकीय दृष्टीकोन वाढवून उद्योजकता विकासासाठी काम करावे’, असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’चे संचालक विनोद पारटकर (उद्योजकता विकासतज्ज्ञ) यांनी केले. ‘कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस’च्या एनजीओ रिसोर्स सेंटर, सहायक टेक महिंद्रा फाऊंडेशन’ यांनी स्वयंसेवी संस्था प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. 25 संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ‘कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस’ कर्वेनगर येथे मंगळवारी दि. 25 ऑगस्ट रोजी हे प्रशिक्षण पार पडले.
प्रकल्प समन्वयक म्हणून ‘सामाजिक संस्थाना तज्ञ मार्गदर्शकांकडून मदत मिळवून, सामाजिक उद्योजकांना विकसित करण्याची तयारी’ निकिता देशपांडे यांनी एनजीओ रिसोर्स सेंटरची भूमिका मांडताना व्यक्त केली.
‘महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ चे संचालक पारटकर म्हणाले, स्वयंसेवी संस्थांकडे समाजाच्या गरजेप्रमाणे कामाच्या स्वरूपात बदल करण्याची लवचिकता असते आणि समाजात बदल घडवून आणण्याची तळमळ असते. याचा उपयोग करून त्यांनी उद्योजकीय प्रेरणा समाजात वाढविल्या तर बरेचसे प्रश्न सुटायला मदत होईल.’ स्वयंसेवी संस्थांच्या प्रशिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
उद्योजकता विकास करण्यासाठी चमकदार कल्पना आवश्यक असतात, त्याला तंत्र आणि व्यावसायिकतेची जोड दिली की मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे शक्य होते, असेही त्यांनी सांगितले.’ निकिता देशपांडे, मालविका सुदामे, प्रा. महेश ठाकूर यांनी स्वागत केले. प्रोजेक्ट डेव्हलप कन्सेप्ट, अंडरस्टँडिग फिजिबिलीटी अस्पेक्ट्स’, डेमोप्लॅन’ अशा मुद्यांवर या शिबिरात चर्चा झाली.