पुणे – भारताचे विक्रमवीर व शिखरवीर डॉ.आनंद बनसोडे याचे दुसरे प्रेरणादाई पुस्तक “स्वप्नपूर्तीचा खजिना-लिव्ह युअर ड्रीम” हे पुस्तक तयार झाले असून येत्या काही दिवसातच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. आनंदला सतत प्रेरित करणाऱ्या तसेच त्याला आतापर्यंत ४ खंडातील ४ सर्वोच्च शिखरे विश्वविक्रमासह गाठून देणाऱ्या प्रेरणादाई व्याक्यांचा संग्रह या पुस्तकात आहे. विजय प्रकाशन द्वारे हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
तरुणांनांसह सर्वांनाच आपल्या कार्याद्वारे व “स्वप्नपूर्ती फौंउंडेशन” द्वारे प्रेरित करणाऱ्या आनंद बनसोडे याने या पुस्तकात सर्वांनाच रोजच उपयोगी पडतील असे प्रेरानादाई वाक्ये या पुस्तकात दिली आहेत. यशाच्या मार्गात अनेकांना वेगवेगळ्या अडचणी आल्यास, अनेक वेळा माघार घेवू वाटते अशा अडचनिवेळी आनंदला नेहमीच शिखरांची सर्वोच्च उंची गाठून देणाऱ्या वाक्यांचा संग्रह या पुस्तकात आहे. या पुस्तकाची विशेषता म्हणजे या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर सहा खंडातील सहा लोकांनी आनंदला या पुस्तकाच्या निमित्ताने सुभेच्छा दिल्या आहेत. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका येथील आनंदच्या “स्वप्नाकडून सत्याकडे” जाणार्या मार्गाला जवळून पाहणाऱ्या लोकांनी यानिमिताने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“या पुस्तकातील व्याक्याचे चिंतन केल्यास नक्कीच आपल्या स्वप्नांच्या दिशेने जाण्यास एक शक्ती मिळेल व येणाऱ्या सर्व अडचणी व संकटाना सामोरे जाण्याचे धाडस अंगी येईल. हे पुस्तक एका दिवसात तयार केले असून सर्व वयोगटासाठी योग्य ठरेल असेच हे पुस्तक आहे. सुट्टीत मुलांना त्यांचे स्वप्न ठरवण्यासाठी व तसे नियोजन करण्यासाठी नक्कीच हे पुस्तक उपयोगी ठरेल”, असे आनंदने सांगितले.
-सहा खंडातील सम्माननीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया-
“आनंदच्या हस्याशिवाय त्याची कल्पना करता येणे शक्य नाही. एव्हरेस्ट चढताना ऑक्सिजन मास्क मध्ये पण तो हसतच असला पाहिजे. पाय जमिनीवर ठेवून असल्यामुळे विश्वविक्रम केलेला आनंद हाच का ? हा प्रश्न पडतो”
व्हायोलेट ( मास्को , रशिया-युरोप)
“आम्ही जे पाहिजे ते मिळवू शकतो असा विश्वासही आनंदच्या मैत्रीने दिला”
अहमद अल्सेहरी ( सौदी अरेबिया, आशिया)
“प्रत्येक टीमचा आनंद एक सकारात्मक भाग असतो”
रोबर्ट डॉबसन (सिडनी, ऑस्ट्रेलिया)
“आनंदसारखा दयाळू माणूस मी पहिला नाही.त्याला कधीच विसरू शकणार नाही”
माटे (टांझानिया, आफ्रिका)
“अजून एवढी शिखरे…आनंदला काहीही शक्य आहे”
संड्रा (इक्वोडोर, दक्षिण अमेरिका)
एका वेळी एक पावूल या प्रमाणे आयुष्याच्या संघर्षातून तू बाहेर आलास.”
विल्सन (कॅनडा, उत्तर अमेरिका)