पुणे : राज्यातील ८० हजार अनाथ बालके भोजन अनुदान नसल्याने उपासमारीच्या उंबरठ्यावर आलेली असतांना आणि ९ हजार बालगृह कर्मचारी वर्षानुवर्षे वेतनापासून वंचित राहून वेठबिगारीचे जीवन जगात असतानाची वस्तुस्थिती शासनाला ज्ञात असतांना हेतू पुरस्कर टाळाटाळ करणारया उदासीन शासनाच्या वेळकाढू धोरणाच्या निषेधार्थ आज (दि. ९) रोजी बालगृह चालक-कर्मचारीनी स्वत:च्या अंगावर चाबकाने फटके मारून घेत अनोखे लक्षवेधी आत्मक्लेश आंदोलन केले.
तीन वर्षापासून अनाथ बालकांचे सुमारे १२५ कोटी रुपयांचे भोजन अनुदान मिळालेले नाही,सदरचे थकीत अनुदान १२१५ या सुधारित दराने एकरकमी मिळावे,बालगृह कर्मचारीना वेतन आणि इमारतीना घरभाडे मिळावे,तसेच मंत्री महोदयांना बालगृहाच्या बाबत नकारात्म महिती देऊन अनाथ बालकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महिला व बालविकास विभागाचे ओर्धन सचिव,उपसचिव व संबधित तत्सम भ्रष्ट यंत्रणेची हकलपट्टी व्हावी,या प्रमुख मागण्यासाठी गत पाच दिवसांपासून बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेच्यावतीने महिला व बालविकास आयुक्तालय पुणे येथे धरणे आंदोलन सुरु आहे.ढिम्म प्रशासन आणि निद्रीस्त शासन या आंदोलनाची दखल घेत नसल्याने आंदोलकांनी प्रचंड संताप व्यक्त करत आज आत्मक्लेश करून घेत स्वत:च्या अंगावर चाबकाचे कोरडे ओठून घेत गगनभेदी घोषणा देत असंवेदनशील शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. या आंदोलनात उषा फाले (वर्धा),ललित कुंभार (परभणी),शेख शाहीन (हिंगोली),सुशीला अल्बाद(नाशिक),कविता वाघ (औरंगाबाद) या महिला आंदोलकंसह माधवराव शिंदे (सातारा),सी. आर. पाईकराव,लालजीबा घाटे (नांदेड)ऱम शिंदे,सुरेश वाघमारे गुरुजी (लातूर)सौदाम सोनपीपळे (नागपूर),जावेद पटेल,उल्हास पाटील,प्रभाकर दंबरे (सोलापूर)डी. पी. नादरगे (उदगीर) इंद्र आहरे,संजय पगारे,संजय आहेर,संदिप शिंदे,आदींनी भाग घेतला.