पुणे-शहरातील स्वच्छता अभियानामध्ये शालेय महाविद्यालयातून विद्यार्थी स्वयंसेवी संस्था स्तरावर
सहभागासह नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. मनपा अधिकारी तसेच कर्मचारी यांनी स्वच्छता अभियाना अंतर्गत
अभियानाचे योग्य नियोजन करुन अभियान यशस्वी करणेसाठी कार्यरत असणे आवश्यक आहे. स्वच्छतेकामी मनपा
अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत. परंतु सुट्टीच्या दिवशी अभियान काळात व अन्य वेळी नागरिकांचा सहभाग
असणे आवश्यक आहे. नागरिक सहभागामुळे योजना व कार्यास गती मिळते. स्वच्छता अभियानाकरिता आवश्यक
जनजागृती होणे सुध्दा आवश्यक आहे. विद्याथ्र्यांच्या सहभागामुळे मोठी मदत होऊ शकते असे त्यांनी सांगितले.
पुणे मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे वतीने स्वच्छ भारत अभियान राष्ट्रीय स्वच्छता मोहिमे अंतर्गत
शनिवारवाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी राष्ट्रपिता महात्मा
गांधी व माजी पंतप्रधान स्व. लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या छायाचित्रास पुष्पहार अपर्ण करुन
अभिवादन केले.
याप्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले की स्वच्छता कामाकरिता
सर्व स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक असून परिसर स्वच्छतेबरोबर सार्वजनिक शौचालये स्वच्छतेकरिता कार्यरत
रहाणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पुणे शहर स्वच्छ व हिरवेगार रहाणेकरिता सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक
असून नागरिक सहभाग ही महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘स्वच्छ व सुंदर पुणेङ्कङ्क या विषयास अनुसरुन जनवाणी संस्थेच्या वतीने पथनाट्य सादर करण्यात
आले. या प्रसंगी विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाचे प्रभाग समिती अध्यक्ष मा. दिलीप काळोखे, मा. मुक्ता टिळक,
मा. महापालिका सहाय्यक आयुक्त माधव देशपांडे, सहमहापालिका आयुक्त विलास कानडे, मा. महापालिका सहाय्यक
आयुक्त युनुस पठाण, डॉ. अमित शहा, कार्यकारी अभियंता राजेंद्र मेदनकर, मा. संदीप खांडवे, मा. शाम ढवळे, अन्य
अधिकारी, कर्मचारी विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, मनपा शाळेतील शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व
परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकमाचे सुत्र संचालन दिपक ढेलवान यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. उप आयुक्त मधुकांत गरड यांनी
केले.
कार्यकमानंतर मनपा शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वच्छता अभियाना अंतर्गत व
परिसरातील नागरिकांसह स्वच्छता प्रबोधन रॅली आयोजन केले. तसेच ऐतिहासिक वास्तु, इमारती, स्वच्छता अभियाना
अंतर्गत शनिवारवाडा येथील झाडणकाम मा. महापौर दत्तात्रय धनकवडे व घनकचरा व्यवस्थापन अधिकारी यांनी केले
असून किशोरी गद्रे व विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.
विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय तसेच हेरिटेज सेलच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विश्रामबागवाडा व
परिसर स्वच्छता केली. अभियाना अंतर्गत शहरातील सर्व १५ क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत प्रभागातील मा. पदाधिकारी,
अधिकारी, कर्मचारी, सभासद, क्षेत्रिय कार्यालय परिसरा अंतर्गत स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन झाडणकाम
करण्यात आल्याचे उपायुक्त श्रीमती किशोरी गद्रे यांनी सांगितले.



