पुणे :
‘शहराचा आर्थिक विकास होऊन त्यातून रोजगारनिर्मिती, नव्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना, उत्पादकता वाढवणे, असंघटित क्षेत्राचा विकास, फेरीवाल्यांचा विचार या गोष्टी महत्वाच्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी तसेच त्यानंतर शहराचे नियोजन कायम ठेवण्यासाठी निधी कसा आणि कोठून मिळवावा? परवाने, परवानग्यांचे स्वरूप, भाडे, कर आदींची आकारणी, तसेच अनुदान आणि कर्जाचा वापर कसा करावा या बाबतीतही सल्लागाराची, नियोजन तज्ज्ञांची गरज आहे. पालिकेला आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा आराखडा तयार केला गेला पाहिजे, रोजगार निर्मिती बरोबरच प्रशासनाचा देखील प्रतिसाद मिळाला पाहिजे.’ असे मत ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स प्लॅनिंग’ तर्फे 17 व्या वार्षिक ‘अभ्युदय’ या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती अरुण फिरोदिया यांच्या हस्ते सोमवारी झाले यावेळी ते बोलत होते.
‘ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स प्लॅनिंग’ तर्फे 17 व्या वार्षिक ‘अभ्युदय’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’ येथे दि. 21 ते 24 डिसेंबर 2015 या दरम्यान करण्यात आले आहे. ‘स्मार्ट सिटीकडे जाताना’ ही या राष्ट्रीय परिषदेची मध्यवर्ती संकल्पना असून, नगर नियोजन, हवामान बदलाचा परिणाम, सार्वजनिक आरोग्य, इको-मोबिलिटी या संकल्पनांवर या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे.
यावेळी बोलताना फिरोदिया पुढे म्हणाले, ‘शहरे स्मार्ट होण्यासाठी आजूबाजूची खेडी स्मार्ट होणे आवश्यक आहे. खेड्यातून शहरात येणार्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे खेड्यांमध्ये रोजगार व उद्योगधंदे उपलब्ध होऊ शकले नाहीत तर तो लोंढा शहरांकडे येणारच त्यामुळे खेडी स्मार्ट होणे आवश्यक आहे. देशभरातील विविध 98 शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा आढावा घेण्याबरोबरच परदेशातील स्मार्ट शहरातील कल्पनांची देवाणघेवाण झाली पाहिजे. वाहतूक व्यवस्था, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, पर्यायवरण, सुरक्षितात आदी विषयांवर चर्चा होऊन तसे नियोजन केले गेले पाहिजे.’
राजन कोप यावेळी बोलताना म्हणाले, ‘स्मार्ट सिटी ही संकल्पना अधिक गुंतागुंतिची आहे. आज या परिषदेसाठी देशातील विविध राज्यातून विद्यार्थी उपस्थित आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून आणि विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून ,स्मार्ट सिटी ची नवनवीन मॉडेल्स या निमीत्ताने पाहायला मिळतील. स्मार्ट सिटी म्हणजे सस्टेनेबल, मोबिलिटी, एफॉरर्डेबल, रिस्पॉनसिव्ह अॅन्ड ट्रान्सपरन्सी असे आहे’.
डॉ. डी.एस.मेश्राम (अध्यक्ष, आय.टी.पी.आय), अरुण पाथरकर, डॉ. बी.बी. अहुजा (संचालक, ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’) बी.एन. चौधरी (उपसंचालक, ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’), एस. एल. पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी आपली मनोगते व्यक्त केली.
शुभम अगरवाल (अध्यक्ष, ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स प्लॅनिंग) यांनी परिषदेची संकल्पना सांगून प्रास्ताविक केले.
या परिषदेसाठी इन्स्टिट्यूट ऑफ टाऊन प्लॅनर्स इंडिया, एरिअन्स, लायन्स क्लब ऑफ पुना इंटरनॅशनल, ‘अल्युमनी असोसिएशन ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’, ‘संजय पगारे अॅन्ड कंपनी’( नाशिक), ‘कोमत्सू एनटीसी लि.’, ‘पुणे महनगर परिवहन महामंडळ’, ‘पब्लिक वर्क डिपार्टमेंट’( महाराष्ट्र), ‘आदित्य किचन सिस्टीम’, ‘ग्रीव्हज पॉवर’, ‘मार्केश रेस्टॉरन्ट’, ‘डॉमिनोज पिझ्झा’, ‘कॅफे चॉकोलेड’, ‘स्मोक एन जोन्स’, ‘एरिझोना रेस्टॉरन्ट’ यांनी सहकार्य केले आहे.
परिषदेमध्ये स्वप्नील पाटील, ख्रिस्तोफर बेनिंजर, व्हि.डब्ल्यू.देशपांडे, अनुपम सराफ, सुजीत पटवर्धन, रामचंद्र गोहाड या तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. नगर नियोजन मास्टर प्लान निर्मिती स्पर्धा, मॉडेल निर्मिती स्पर्धा, प्रश्नमंजुषा आदी स्पर्धांची रेलचेल या परिषदेत असणार आहे.
या परिषदेत 700 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून देशभरातील 18 महाविद्यालये सहभागी झाली आहेत. डॉ. प्रताप रावळ, आकांशा नरोडे, संयुक्ता पगारे, राज मुछाल,अक्षय उकीर्डे, संकेत पगारे, ऐश्वर्या जयस्वाल, प्रियांका कदम यांनी या परिषदेचे संयोजन केले आहे.
परिषदेच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश झगडे (पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी) हे आहेत. तसेच अरुण पाथरकर (सीडको), डॉ. भोसले, डॉ.पी.एम.रावळ, एम.डी.लेले यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

