स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत पुणे नं. १ करण्यासाठी व शहरातील नागरिकांची मते लिखीत स्वरुपात मोठ्या प्रमाणावर संकलित करण्यासाठी शहरातील विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, बांधकाम व्यावसायिक, रिक्षा संघटना, हमाल पंचायत, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती, रिक्षा पंचायत, नेहरु युवा केंद्र, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट्स, क्रेडाई माहेर चितपावन संघ, स्वच्छ भारत, कागद काच पत्रा संघटना, पुणे शहर रिक्षा फेडरेशन, सावकाश रिक्षा संघ, नंदन बिल्डकॉन अशा विविध संघटना आपल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सहभागी होऊन पुणे नं. १ करण्यासाठी सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध संघटनांच्या बैठकीचे आयोजन पुणे महापालिकेतील महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात करण्यात आले होते.
याप्रसंगी मा. अनिल पवार (उपायुक्त) यांनी स्मार्ट सिटी अभियाना संदर्भात संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. शहराच्या विकासाच्या दृष्टीने असलेल्या समस्या याबाबत करावयाच्या उपाय योना, कोणते क्षेत्र आहेत, काय सुधारणा केल्या पाहिजेत त्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी नागरिकांच्या मतांनुसार प्रस्ताव करणे याकरिता वाहतुक आणि गतिशीलता, गृहनिर्माण उपाय, पाणीपुरवठा आणि मलनि:स्सारण, उर्जा, कचरा आणि स्वच्छता, सुरक्षितता आणि संरक्षण, अर्थव्यवस्था आणि रोजगार, ई-गव्हर्नन्स आणि डिजीटल, शिक्षण, आरोग्य काळजी आणि प्रसुतीविषयक, संस्कृती-मनोरंजन आणि पर्यटन, पर्यावरणीय लेखी फॉर्ममध्ये नमूद करुन संकलन करावयाचे आहे. याकरिता मनपाचे कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना, महिला बचत गट, तनिष्का महिला गट अशा विविध स्तरावरुन नागरिकांशी संपर्क साधून सविस्तर माहिती संकलित करीत असल्याचे सांगितले. तसेर्च www.punesmartcity.in यावरही संपर्क साधता येईल.
विविध कंपन्या, माहिती तंत्रज्ञान कंपन्या सहभागी झालेल्या असून याकामी बहुमुल्य मदत होत आहे. झेन्सार, फिक्की, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज, प्रसारमाध्यमे, डिलीव्हरी चेंज फाऊंडेशन, मगरपट्टा सिटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी अशा वैविध्यपूर्ण स्तरांवरुन नागरिक सहभाग वाढत असून उच्चांकाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असल्याचे सांगितले. तसेच याकामी नागरवस्ती विभागा अंतर्गत असलेले सुमारे ५३०० शेजार समुह गट, ९५ समुह संघटिकांचे गट अशा मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. हडपसर मगरपट्टा सिटीतील सुमारे ३०००० रहिवासी व ५०००० कर्मचाèयांनी सहभागी होण्याकरिता मगरपट्टा सिटीचे अध्यक्ष मा. सतिश मगर यांनी आवाहन केले आहे.
बैठकीप्रसंगी उपस्थितांनी विचारणा केलेल्या शंका, प्रश्नांचे व कशा पध्दतीने ऑनलाईन- ऑफ लाईन काम करावयाचे आहे. याबाबत अध्यक्षस्थानी असलेले मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश बकोरिया, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) राजेंद्र जगताप, उपायुक्त अनिल पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी रिक्षा संघटनांचे वतीने संपूर्ण शहरात ४५००० रिक्षाचालक सहभागा होऊन प्रवाशांचे ही फॉर्म भरणार असल्याचे सांगण्यात आले.
१२ क्षेत्रांपैकी पर्यावरण विषयावर योगदान देणार असल्याचे क्रेडाईचे संजय देशपांडे यांनी सांगितले. तसेच पाणीपुरवठा व मल:निस्सारण क्षेत्राकरिता योगदान देण्याचे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट्सच्या श्रीमती ज्योती पानसे यांनी सांगितले.
याप्रसंगी क्रेडाई संस्थेच्या वतीने संजय देशपांडे, आय. पी. इनामदार, तेजराज पाटील, डॉ. अभ्यंकर, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती, हमाल पंचायत, रिक्षा पंचायतीच्या वतीने नितीन पवार, अेईएसए च्या वतीने संजय तासगांवकर, पुष्कर कानविंदे व अध्यक्ष दिवाकर निमकर, नेहरु युवा केंद्राचे वतीने भारत गांधी, विनीत मलापुरे, माहेर चितपावन संघाचे वतीने अॅड. बळवंत रानडे, स्वच्छ भारत संस्थेच्या वतीने लायन अनिल मंद्रुपकर, कागद काच पत्रा संघटनेचे हर्षद बर्डे, रिक्षा संघटनांचे बाबा शिंदे पुणे शहर रिक्षा फेडरेशनचे सुर्यकांत जगताप, सावकाश रिक्षा संघाचे प्रदीप भालेराव, रिक्षा पंचायतीचे रावसाहेब कदम, नंदन बिल्डकॉनचे शामकांत कोटकर व अन्य पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक स्वागत पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी केले तर आभार प्रदर्शन अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले.