‘स्मार्ट सिटी’ च्या समर्थनार्थ ‘फ्रेंडस् ऑफ बीजेपी’ ची पालिकेसमोर निदर्शने
‘स्मार्ट सिटी लाओ, पुणे बचाओ !’ चा निदर्शनात नारा
पुणे :
पुणे शहराचे केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी राजकीय कारणावरून चाल-ढकल करणार्या पक्षांच्या विरोधात ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ या फोरमच्या वतीने शनिवार, 12 डिसेंबर रोजी पालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. ‘स्मार्ट सिटी लाओ, पुणे बचाओ !’ असा नारा या निदर्शन रॅलीतून देण्यात आला. या निदर्शनाचे नेतृत्व ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या प्रदेश सहसमन्वयक उषा बाजपेयी यांनी केले.
या निदर्शन रॅलीमध्ये 1000 विद्यार्थी, गृहिणी, विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निदर्शन रॅलीस कन्याशाळा (नारायण पेठ) येथून सुरूवात होऊन पालिकेसमोर निदर्शने करण्यात आली आणि रॅलीचा शनिवार वाडा येथे समारोप झाला.
‘राजकारण्यांनी पुण्याच्या भविष्याशी खेळू नये, पुण्याचा विकास हेच एकमेव उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवावे’, असे आवाहन निदर्शनामध्ये ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या प्रदेश सहसमन्वयक उषा बाजपेयी यांनी केले.