पुणे- पुणे शहराच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये लोक सहभाग असावा म्हणून महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत चक्क ४० हजाराहून अधिक नागरिकांनी आपापली मते आणि सूचना मांडल्या आहेत अशी माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांनी येथे दिली
ते म्हणाले पुणे शहराच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये लोक सहभाग घेण्यासाठी शहराच्या विविध विकासकामे, प्रकल्प, योजना, करावयाची कामे, आवश्यक बदल, याकरिता नागरिकांकडून आपली मतं, सूचना मागविणे अर्थात लोक सहभाग वाढवून नागरिकांच्या सूचनानुसार स्मार्ट सिटीमध्ये आवश्यक अंतर्भाव करण्यात यावा याकरिता . महापौर दत्तात्रय धनकवडे व महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकार परिषदेद्वारे आवाहन केले त्यानुसार नागरिकांनी आपली मतं, आपल्या सूचना दि.२० जुलै,२०१५ रोजी पर्यंत महानगरपालिकेच्या smartcity.punecorporation.org किंवा punesmartcity.in यावर तसेच www.facebook.com/pmcpune यावर सूचना, मतं मागविली होती. त्यानुसार दिनांक १४/०७/२०१५ सायंकाळपर्यंत सुमारे ४०००० पेक्षा अधिक नागरिकांनी संपर्क साधला, तसेच ३५० पेक्षा अधिक नागरिकांकडून सूचना/ मतं प्राप्त झालेले आहेत.