पुणे- स्मार्ट सिटी प्रकल्पाला महापलिकेत मान्यता द्यायची किंवा कसे ? याबाबत शहर काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी पक्षश्रेष्ठी यांच्या शी विचारविनिमय करूनच निर्णय घेईल मात्र या प्रकल्पातील अडचणी आणि त्रुटी, त्याचे शहरावर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर होणारे परिणाम यावर आपले आणि पक्षातील नगरसेवकांचे मत ठामपणे श्रेष्ठींना सांगू .. आणि त्याप्रमाणे उद्याच्या महापालिकेच्या खास सभेत निर्णय घेवू आणि आवाज उठवू असे शहर काँग्रेस चे अध्यक्ष अभय छाजेड यांनी येथे सांगितले .आज कॉंग्रेस भवन येथे श्री छाजेड यांच्या अध्यक्षतेखाली , स्मार्ट सिटी ‘ प्रकरणी नगरसेवकांची बैठक झाली यावेळी महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे , उपमहापौर आबा बागुल , कमलताई व्यवहारे , सुधीर जानज्योत , सनी निम्हण , अविनाश बागवे , संजय बालगुडे , सुनंदा गदाळे, शिवा मंत्री , अनिस सुंडके, अमित बागुल आदी उपस्थित होते .
छाजेड म्हणाले , शहरात विकासाच्या योजना राबवायला मुळीच विरोध नाही . पण महापालिकेने त्या राबवाव्यात . त्यासाठी महापालिका सक्षम करावी . केंद्राने आणि राज्याने महापालिकेला नेहमीच आर्थिक मदत केली आहे . आता स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी एसपीव्ही कंपनी कशासाठी आणली जाते आहे . यामुळे महापालिकेच्या स्वायत्ततेवर गदा येईल महापालिकेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले ,’ हि एसपीव्ही कंपनी ही इस्ट इंडिया कंपनी प्रमाणे शिरकाव करू पाहते आहे आमचा नवनवीन विकासाच्या योजना राबवायला पाठींबा आहे पण कंपनीराज त्यासाठी आणायला विरोध आहे . नगरसेवक अविनाश बागवे म्हणाले , ‘ एस पी व्ही कंपनी नकोच . या कंपनीला आमचा विरोध आहे . जे काही करायचे ते महापालिकेने करावे . त्यासाठी सरकारने महापालिकाच सक्षम करावी .


