पुणे – स्मार्ट सिटी करिता पुणे शहरातील नागरिकांनी वेळोवेळी घेतलेला सहभाग व पुणे महानगरपालिकेनी वेळोवेळी केलेले उत्तम नियोजन,विविध टप्प्यातील यशस्वी नियोजन कौतुकास्पद ठरलेले असून राष्ट्रीय स्तराबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याबाबतची नोंद घेण्यात आल्याचे प्रतिपादन दक्षिण ऑस्ट्रेलियातील Adled शहराचे माजी महापौर मा.स्टीफन यारवूड यांनी केले.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने घोले रस्त्यावरील प्रशिक्षण प्रबोधिनी केंद्रा नजीकच्या वॉर रूम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी विविध विभागाचे खातेप्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मार्ट सिटी अंतर्गत नागरिकांनी सुचविलेल्या विकास कामा संदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी संगणकीय सादरी करणा द्वारे विविध शहरातील समस्ये बाबत माहिती दिली.
याप्रसंग पुणे महापालिका अधिकारी तसेच सिम्बायोसिस म्यानेजमेंटच्या विध्यार्थानी विविध प्रश्न विचारणा करून चर्चेत सहभाग घेतला.मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र जगताप यांनी याप्रसंगी संगणकीय सादरी करणा द्वारे पुणे महानगरपालिकेनी आजपर्यंत केलेल्या विविध टप्प्यातील नागरी सहभागा संदर्भात यशस्वी नियोजनाची माहिती दिली.मा.महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनीही स्मार्ट सिटी बाबत तसेच पुढील नियोजनाबाबत माहिती दिली व आभार प्रदर्शन केले.
मा.महापौर स्टीफन यारवूड यांनी कार्यशाळेस येण्यापूर्वी औंध बाणेर परिसराची सायकलवरून फिरून पाहणी केली व माहिती घेतली.माजी महापौर दत्तात्रय गायकवाड तसेच शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी त्यांना माहिती दिली,याप्रसंगी उपायुक्त मा.सुनील केसरी,अनिरुद्ध पावसकर महापालिका साह्यक आयुक्त संदीप कदम उपस्थित होते.


