पुणे-
शहरे स्मार्ट करायला कोण का विरोध करेल भाऊ? कोणाला वाटेल आपले शहर स्मार्ट नसावे ? आणि आमचे पुणे होते किती सुंदर … सगळीकडे रस्तोरस्ती होती झाडे … हवेशीर पुणे .. पेन्शरांचेपुणे -सायकलीचे पुणे .. विसरलोत कुठे आम्ही ..ना विसरलो खंडाळ्याचा घाट.. आणि त्यातील हवा थंडगार … ना विसरलो कोतवाल चावडी … ना विसरलो वाड्यावाड्यात पोहोचणारे चवदार थंड पाणी … पण आता जमाना बदलला तसे नको का आम्हाला बदलायला … आता जो तो आपल्या गावात- राज्यात पोटापाण्याच्या समस्येने त्रस्त झाला म्हणून धावतोय पुण्याकडे … बापरे बाप इथला सारा प्रकारच बदलला इथली सदाशिव पेठ दूर पळाली… टांगे – सायकली नाहीस्या झाल्या .. बरे बसचा कारभार डोईजड म्हणून दुचाक्या लोकांनी पत्करल्या . दुचाकी असेल तरच नौकरी होती आणि आहे कि भाऊ… वाढ वाढ शहरे वाढली … अजगर नाही वाढत , बकासुर नाही वाढणार , कुंभकर्ण नाही एवढा झोपणार … एवढी शहरे बकाल झाली .. आमच्या पुण्याचं रुपडं हरवलं . वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी स्काय बस .. बी आर टी , पीएमपीएमएल.. खूप धावल्या … आता म्हणे मेट्रो येणार … ऐकावे ते नवलच .. शिवाजी नगर हून स्वारगेट पर्यंत ती अंडर ग्राऊंड पद्धतीने येणार म्हणे … काय काय नवनवीन तंत्र आले , येईल भाऊ.. भुयारातून मेट्रो पुण्यात येईल … जशी बीआरटी आली आणि नाहीसी झाली तशी होवू नये म्हणजे झाले … आता पुणे स्मार्ट करणार म्हणे काय करणार ? १२०० कोटी तर मेट्रोच्या पहील्या टप्प्याला जाणार .. अर्थात तिचा स्मार्ट पुण्याशी संबध नसेल ? हो ना रे भाऊ? मग करणार काय? वाहतुकीचा प्रश्न मेट्रोने सुटेल .आणखी … ? पिण्याच्या पाण्याचे खूप हाल आहेत भाऊ सध्या .. शहरात प्रत्येक ऑफिसात पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे – येते कधी.. आणि जाते कधी..कळतच नाही . त्यामुळे आम्ही घरूनच पाणी नेतो . ते ही आमच्या सौ . घरी पिण्याचे पाणी जेव्हा कधी येईल त्यासाठी सर्वात प्रथम तत्पर असतात म्हणून . शहर जर स्मार्ट झाले तर सगळी कडे २४ तास प्यायला पाणी मिळेल कारे भाऊ? आणि हो आमचे एक महत्वाचे दुखणे आहे … कुठ्ठे भाऊ लघुशंकेला जागाच नाही मिळत . सगळीकडे लोक ये जा करीत असतात त्याचा हि प्रश्न सुटेल कारे ? नौकरीची शाश्वती , सुलभ आणि उपयुक्त शिक्षणाची हमी . कमी खर्चात लग्न होण्याची आणि अधून मधून म्हणजे महिन्यातून दोनदा सिनेमा पहायला अगदी खर्चाचे टेन्शन ना घेता मज्जेत जाता येईल कारे भावू ? आणि हो भाऊ.. सारखे सारखे पेट्रोल पंपावर जावे लागते ३५ रुपयाच्या पेट्रोल वर ३५ रुपये कर भरून पदरात घ्यावे लागते ते पेट्रोल विना कर मिळेल कारे भावू ? आणि ३० रुपयांची तुरडाळ पुन्हा कधी १००-२०० ने घ्यायची वेळ तर येणार नाही न भाऊ?
एक ना अनेक प्रश्न आहेत रे दादा तुझे ? एक जरा समजून घे … ‘स्मार्ट पुणे’ म्हणजे काय याचा शोध आपल्यासारख्याला लागायचाय अजून .
दादा , साडेतीन हज्जार कोटी रुपये ५ वर्षात खर्च करून पुण्याचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा … हे शहर स्मार्ट करायचे असा निर्णय भाजपच्या सरकारने घेतला आहे अर्थात यासाठी केवळ ५०० कोटी केंद्राने तर राज्याने २५० कोटी निधी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे . आणि महापालिकेला २५० कोटी खर्च करा असे सांगितले आहे . आता प्रश्न आहे तो बाकीच्या २५०० कोटींचा ? ते कुठून आणणार ? तर साहजिक … यांच्या कंपन्या … उद्योजक तयार आहेत . हा पैसा लावायला … कारण पुणे स्मार्ट करायचे आहे ना ? आता हा पैसा त्यांनी लावला तर ते वसूल हि करणारच कि दादा … आपण अनेक रस्त्याची कामे खाजगी कंपन्यांकडून झालेली पाहतो आणि ते टोल गोळा करतानाही पाहतो … आता सध्या जे २५०० कोटी रुपये खाजगी उद्योजक लावणार आहेत असे म्हटले जाते साहजिकच हा आकडा वाढणार हि आहेच . आणि या पैशाची वसुली अर्थातच याच कंपन्या करतील आणि ती आपल्याकडूनच बरे दादा, हे सूर्य प्रकाश इतके स्वच्छ आहे म्हणजे आताचे २५०० कोटी … संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यावर किती कोटीपर्यंत पोहोचणार ? आणि समजा होणारच असेल तर त्यातून पुणे किती स्मार्ट होणार ?काय काय नागरिकांपर्यंत पोहोचणार ? असे अनेक प्रश्न आहेतच आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पुणे अशा प्रकारे स्मार्ट झाल्यावर ..पुणेकरांना आपल्या खिशातून कुठे कुठे -कसा कसा टोल भरावा लागणार , मिळकत कर , पाणीपट्टी , भाऊ पे फस्ट… नंतर पार्किंग … यात काय काय फरक होणार आहे याचा विचार नको का करायला ?
आता मुंबईत मेट्रो आणली .. तर तिचे भाडे ठरविण्यावरून , रस्त्यांवर टोल भरण्यावरून , नंतर त्यापोटी हप्ते खाणाऱ्यावरून भांडणे होतातच की… मुंबई केंद्राच्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला .केंद्रात जरी प्रचंड बहुमत असले तरी यापुढे होणाऱ्या विविध निवडणुकात भाजपला बहुमत मिळविणे मुश्कील होत चालले आहे . आता पुढे कुठे कोणत्याही निवडणुका होवू देत ,,तिथे भाजपचे नाही सरकार आले तरी … होल्ट मात्र भाजपचाच राहायला हवा या साठी तर अशा ‘स्मार्ट’ स्वप्नांची मखमली चादर ऐन थंडीत पांघरण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? अशी शंका का येवू नये आपल्याला . कारण ‘अच्छे दिन ‘ची वाट पहाता पहाता आता आपण स्मार्ट पुण्याचे स्वप्न पाहू लागलो आहोत .
दादा स्वप्नच ती , झोपेतच पहावीत रे . .. जागेपणी स्वप्नांच्या मागे धावून, स्वप्ने हाती लागतील काय ? त्या पेक्षा
आपण रमू या नक्कीच स्वप्नात .. राहू देखील स्वप्नांच्या जगात … पण आता दिवस उगविला आहे , सोड सारे आणि लक्ष दे आपल्या कामात …