पुणे : वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील मे. ओम साई स्टोन क्रशरमध्ये 5244 युनिट्सच्या 71 हजार 250
रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की मंचर विभाग अंतर्गत वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील अजित दशरथ मोरडे
यांचा ओम साई स्टोन क्रशर नावाचे खडी केंद्ग आहे. या खडी केंद्गातील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने
वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यात मीटरमध्ये वीज वापराची नोंद कमी व्हावी यासाठी हेतूपुरस्सर
वीजयंत्रणेत फेरफार करण्यात आल्याचे दिसून आले. वीजयंत्रणेतील फेरफारनंतर सदर खडी केंद्गात 5244 युनिट्सच्या 71
हजार 250 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
या वीजचोरीप्रकरणी मे. ओम साई स्टोन क्रशरच्या संचालकाविरुद्ध मंगळवारी (दि. 20 ऑक्टो.) रास्तापेठ (पुणे)
येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
सदर खडी केंद्गातील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात
अधीक्षक अभियंता श्री. शिवाजी चाफेकरांडे, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश खांडेकर, श्री. सुरेश
वानखेडे, उपकार्यकारी अभियंता श्री. अनिल चौगुले, सहाय्यक अभियंता श्री. विवेक शिंदे, तंत्रज्ञ श्री. गोपाळ बिरकड यांनी
योगदान दिले.


