पुणे-
नाविण्यपूर्ण प्रकल्प नागरीकांना पाहायला मिळणार. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व
उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून ‘स्केरी मिरर मेझ’ हा प्रकल्प त्यांच्या प्रभाग क्र. ६७
मध्ये वसंतराव बागुल उद्यान सहकारनगर येथे उभारण्यात आला आहे.
स्केरी मिरर मेझ म्हणजेच आरशांचा भुलभुलैय्या हा प्रकल्प भारतरत्न पं. भीमसेन जोशी
कलादालन येथील वातानुकुलीत हॉलमध्ये उभारण्यात आला आहे. आतमध्ये गेल्यावर आरशामध्ये
आपण रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतो पण गोंधळून जातो रस्ता सापडत नाही. मध्येच रस्ता
सापडल्यासारखे वाटते पण पडदा हलला की आपल्याला असे जाणवते की आपण पिंजऱ्यात उभे
आहोत. तसेच पुन्हा एकदा बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला लागल्यास त्या ठिकाणी भिंत
असल्याचा भास होतो. रंगीबेरंगी लाईट इफेक्टमुळे वेगळा अनुभव अनुभवयास मिळतो.
याबरोबरच या स्केरी मिरर मेझ मध्ये जसे आपण आतमध्ये जातो तसे आणखी वेगवेगळे
अनुभव येतात. जसे दरीवरील हलणारा पुल, बाजुला खोल दरीचा भास, अचानक अंगावर येणारा
डायनासोर, खुनी दरिंदा, काळी गुफा व घाबरविणारे ध्वनी इ. अनुभव घेता येईल.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व वयोगटातील नागरिकांना याचा आनंद घेता येणार
आहे. स्केरी मिरर मेझ हा प्रकल्प प्रिमियम वर्ल्ड टेक्नोलॉजी लिमिटेड व गिनीज बुक ऑफ
वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अँड्रीन फिशर यांनी तयार केला आहे व पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर
आबा बागुल यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आला असून लवकरच नारिकांना याचा आनंद घेता
येणार आहे. यामुळे पुणे हे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक नगरी या बरोबरच आता पर्यटनाचे शहर
म्हणून वाटचाल करीत आहे. असे आबा बागुल यांनी सांगितले.
आजच्या तरुण पिढीला जगताना अनेक संकटाना सामोरे जावे लागते या संकटाना न
घाबरता त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण स्वतः रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला
शोधण्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाची चाचपणी करतो. यासाठी गोंधळून न जाता या स्केरी मिरर
मेझ भुलभुलैय्यातून बाहेर पडताना धैर्य, जिद्द, कल्पकता व आत्मविश्वास या गुणांची पारख
होते. वैयक्तिक आयुष्यात देखील या गुणांचा उपयोग जीवन यशस्वी होण्यासाठी होतो. असे
प्रतिपादन उपमहापौर आबा बागुल यांनी यावेळी केले.