सोने 25,000 रुपयांच्या खाली…
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतींनी गेल्या पाच वर्षांची नीचांकी पातळी गाठली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅमसाठी 25,000 रुपयांच्या खाली घसरल्या आहेत. त्यासोबतच चांदीची किंमतीही 34,350 रूपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढला आहे. गुंतवणूकदारांनी बाजारात सोन्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. न्युयॉर्क बाजारात सोन्याच्या किंमती 1,129.60 डॉलर प्रति पौंडवर पोहोचल्या आहेत. एप्रिल 2010 पासूनची ही सर्वांत मोठी घसरण आहे. या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावर झाला असून देशात सोने गेल्या पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. चांदीच्या किंमती एक टक्क्याच्या घसरणीसह 14.83 डॉलर प्रति पौंडवर पोहोचल्या आहेत.
प्लॅटिनमच्या किंमतीतदेखील 5% घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात प्लॅटिनमच्या किंमती 942.49 डॉलर प्रति पौंड झाल्या असून फेब्रुवारी महिन्यापासूनची मोठी घसरण आहे.