नवी दिल्ली
माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काट्जू यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. यावेळी काट्जू यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. ‘सोनिया, मनमोहन सिंह या दोन्ही व्यक्ती भामट्या आहेत, तर नरेंद्र मोदी हे नरसंहारक आहेत. या तिघांनाही जिवंत राहण्याचा अधिकार नाही,’ असं काट्जू यांनी म्हटलं आहे.
काट्जू यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व ट्वीटर अकाउंटवर या संदर्भातील पोस्ट टाकल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये काट्जू म्हणतात…
”घोटाळ्यांवर घोटाळे करून देशाची कोट्यवधी रुपयांची लूट करणारे सोनिया गांधी व मनमोहन सिंग हे भामटे आणि हरामखोर आहेत. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडवून आणणारे नरेंद्र मोदी हे सुद्धा धोकेबाज आहेत. या तिघांना जगण्याचा अधिकार आहे का? अजिबात नाही. त्यांनी आपल्या कर्मानं जगण्याचा अधिकार गमावला आहे.”काटजूंनी लिहिलं आहे की, “घोटाळे करुन देशांला लूटणाऱ्या सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांच्यासारख्या ‘ठग’ आणि ‘हरामखोर’; तर नरेंद्र मोदीसारखे कपटी आणि खुनी लोकांनी जगायला हवं? नाही, त्यांनी त्यांच्या कृत्यामुळे जगण्याचा अधिकार गमावला आहे.”