(Foundation Diploma in Architecture & Design)
पुणे -वास्तुविशारद क्षेत्रात आपले भवितव्य घडवू इच्छिणारया विद्यार्थ्यांसाठी सुर्यदत्ता
ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे प्रथमच वास्तूविशारद आणि रचना क्षेत्रातील प्राथमिक पदविका
अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती
ते म्हणाले , या क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमाला सामोरे जाण्यापूर्वी
विद्यार्थ्यांना या विषयाची तोंड ओळख व्हावी, या उद्देशाने हा विशेष अभ्यासक्रम सुरु होत
असून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकतात. या
अभ्यासक्रमातील महत्वाची बाब म्हणजे, हा अभ्यासक्रम ११ वी १२ च्या अभ्यासक्रमाशी समांतर
आहे.
या अभ्यासक्रमातील विषयांची रचना विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे. यातील अर्धे विषय
हे ११ व १२ च्या विज्ञान शाखेतील (cbsc pattern) विषयांवर तर उर्वरित विषय वास्तूविशारद
आणि रचना क्षेत्रावर आधारित आहे. यामुळे कोणत्याही शाखेच्या पदवीसाठी आवश्यक असणाऱ्या
प्रवेशिका परीक्षेच्या तयारीसाठी हा पदविका अभ्यासक्रम लाभदायी ठरेल यात शंका नाही.
सद्य: असलेला ११ वी १२चा अभ्यासक्रम आणि वास्तुविशारद क्षेत्रातील पदवीसाठी घेतली
जाणारी प्रवेशिका परीक्षा यातील अभ्यासक्रम एकमेकांशी सबंधित नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना
प्रवेशिका उत्तीर्ण होणे अवघड जाते. या परीक्षेत अपयश आल्याने अनेक विद्यार्थ्यांना आवड
असूनही या क्षेत्रापासून वंचित राहावे लागते. विद्यार्थ्यांचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी हा
विशेष पदविका अभ्यासक्रम सुरु होत असून ही पदविका प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याना पुढील
पदवीचा मार्ग नक्कीच सुकर होईल, अशी खात्री आहे.
हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांस कोणत्याही नावाजलेल्या कला महाविद्यालायात
सहजरित्या प्रवेश मिळू शकतो. तसेच वास्तूविशारद क्षेत्राशी निगडित पदवी अभ्यासक्रम उदा.
इंटेरियर डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन, फर्निचर डिझाईन, सेट डिझाईन, इंडस्ट्रीयल डिझाईन इ.
डिझाईन क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमासही प्रवेश घेता येवू शकतो. हे अभ्यासक्रम आयआयटी
(इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी) कॅम्पस येथेही सुरु आहेत.
पदविका अभ्यासक्रमाचे आणखी एका वैशिष्ट्य म्हणजे येथे आखीव अभ्यासक्रमाबरोबरच विशेष
शिबिरेही विद्यार्थ्यासाठी घेतली जाणार आहेत. वास्तूविशारद, कला आणि डिझाईन क्षेत्रात
आपल्या आवडीनुसार शाखा निवडायची संधी या पदविकेमुळे विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.
त्यामुळे या क्षेत्रात करीयर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम नक्कीच फलदायी
ठरेल.