भारतीय परंपरेतील दिवाळी या अतिशय मंगलमयी, पवित्र आणि आनंदाची भरभराट करणारा सण. दिवाळी पहाटेचे औचित्य साधून संतोष पोतदार इवेन्ट्स यांनी ‘सुरोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये सकाळी साडेपाच वाजता केले होते. संतोष पोतदार इवेन्ट्स या संस्थेचे यंदाचे १५ वे वर्ष असून.पं.विश्वमोहन भट, पं. संजीव शंकर – पं. अश्विनी शंकर, आणि पं. डॉ. अरविंदकुमार आझाद अश्या चार दिग्गज कलाकारांचा समावेश होता.
मैफिलीच्या सुरुवातीला पं. संजीव शंकर – पं. अश्विनी शंकर यांनी शहनाई या अतिशय मंगलमयी वाद्यावर ‘ललत’ राग वाजविला. त्यामध्ये आलाप, जोड, नंतर विलंबित एकतालातील ख्याल आणि त्याला जोडून द्रुत तीन तालातील गत सादर केली. गंभीर रागातील संथ आलापी, लयकारी, ‘झाल्या’चे प्रकार,जलद तान अशी काही वैशिष्ठ्ये पं. संजीव शंकर – पं. अश्विनी शंकर यांच्या शहनाई बद्दल सांगता येतील.त्यानंतर पं. विश्वमोहन भट यांनी मोहनवीणा या वाद्यावर ‘नटभैरव’ हा राग छेडला. ‘नटभैरव’ हा राग ‘भगवान शिव’ यांनी निर्माण केलेला राग असून आलापिंमधून शिव-तांडव ची अनुभूती पं.विश्वमोहन भट यांनी रसिक श्रोत्यांना दिली.’मोहनविणा’ हे वाद्य स्वत: पंडितजींनी निर्माण केले असून अतिशय मधुर नाद निर्माण होणारे वाद्य आहे.’नटभैरव’ या रागामध्ये संथ आलापी, जोड, झाला, मध्यलय तीन ताल आणि द्रुत तीन तालातील रचना सादर केल्या.
उत्तरार्धाची सुरुवात ‘शहनाई’ आणि ‘मोहनविणेच्या’ ‘जुगलबंदीने झाली.’वैष्णवजन तेने कहिये’ या अतिशय प्रसिद्ध अश्या भजनाने सुरुवात करून असंख्य स्वरसंगतींनी त्यांना नटविले गेले.त्यानंतर ‘भैरवी’ रागातील पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर करून ठेवलेले ‘जो भजे हरी को सदा’ या भजनाची धून त्यांनी वेगळ्या पद्धतीने सादर केली. तबल्यावर बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंदकुमार आझाद साथीला असल्यामुळे अलौकिक स्वर-तालाची अनोखी संगत रसिकांना अनुभवता आली. शिरीष कुलकर्णी यांनी निवेदन केले . मैफिलीची सांगता

‘ वन्दे मातरम’ आणि ‘अतिशय मोहक रीतीने नटविलेल्या राष्ट्रगीताने करण्यात आली.