पुणे, ता. २८ : देते कोण देते…च्या ठेक्यावर आबालवृद्धांनी धरलेला ताल…दमलात
तुम्ही आई बाबा, जरा झोपा आता गाढ… या गाण्यावर झालेला भावनांचा कल्लाेळ अन
मी मोर्चा नेला नाही… या गद्यावर रसिकांचा पिकलेला हशा अशा आल्हाददायी
वातावरणात पुणेकरांची शनिवारची संध्याकाळ रंगली. निमित्त होते डीएसके समूहाच्या
वतीने आयोजित कवी संदीप खरे व संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी यांच्या ‘आयुष्यावर
बोलू काही’च्या कार्यक्रमाचे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सतर्फे ग्राहक आणि
हितचिंतकांसाठी न्यु इंंग्लिश स्कूल रमणबागेच्या प्रांगणावर स्नेहमेळाव्याचे आयोजन
केले होते. या वेळी डीएसके समूहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, शिरीष
कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाचपोर, अमित कुलकर्णी, भाग्यश्री
कुलकर्णी, तन्वी कुलकर्णी उपस्थित होते.
पाचशेहून अधिक प्रयोग केलेल्या या कार्यक्रमाचा आजचा प्रयोगही पहिल्या
प्रयोगाप्रमाणे तितकाच उत्साहवर्धक वाटतो, असे सलील कुलकर्णी म्हणाले. शुभंकर
याने आठ दिवस सहा पेपर नंतर सु्टटी, अप्रतिम गाणी सादर करत रसिकांची मने
जिंकली. तर आर्या आंबेकरचया अस्सल रागदारीतील आयटम साँग ‘देही वणवा
पिसाटला’, ‘अर्ध्या रात्री सोडून जायचं नाय’ या दोन गाण्यांना प्रेक्षकांना थिरकावयाला
लावले. संदीप खरे यांनी सादर केलेली ‘नसतेस घरी तू जेव्हा’, ‘दमलेल्या बाबाची
कहाणी’ या गाण्याने प्रेक्षकांची मन हेलावले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकांनी ‘अगं बाई
ढग्गो बाई’ या गाणावर धरला. अमर ओक यांचे मंत्रमुग्ध करणारे बासरी वादन,
ढोलकीच्या तालावर नाचविणारा नीलेश परब यांच्या सादरीकरणामुळे रसिक तृप्त
झाले.
या वेळी डी. एस कुलकर्णी यांनी डीएसके समूहाच्या नवीन प्रकल्पांविषयी आणि
भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. समूहाच्या प्रगतीत ग्राहक आणि ठेवीदार यांचा
सिंहाचा वाटा असल्याची कृतार्थ भावनाही त्यांनी व्यक्त केली.
ड्रीमसिटी सारख्या प्रकल्पामधून केवळ घरे बांधण्याचा विचार नसून कुटुंबातील
प्रत्येकाला एकत्र आणण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी मेकिंग ऑफ
ड्रीमसिटी ही ध्वनिचित्रफितही दाखवण्यात आली.
यावेळी गायक आणि कलाकारांचा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

