हरेकृष्ण एक्स्पोर्ट्स कंपनीच्या १२०० कामगारांना ५० कोटीचा बोनस
सुरत – येथील हरेकृष्ण एक्स्पोर्ट्स कंपनीचे मालक आणि हीरा व्यापारी साबुभाई ढोलकिया यांनी त्यांच्या कर्मचार्यांना या दिवाळीत बोनस – बक्षिशी म्हणून कार, फ्लॅट आणि हिरे जडीत दागिने दिले आहेत. दिवाळीच्या बोनससाठी एकूण 1200 कर्मचार्यांची यादी बनवण्यात आली आहे. यामधील 491 कर्मचार्यांना महागड्या कार देण्यात आल्या. तर या व्यतिरिक्त 525 कर्मचार्यांना हिरेजडीत दागिने आणि 200 कर्मचार्यांना फ्लॅट देण्यात आले आहेत.
दिवाळीला सर्वच कर्मचार्यांना सर्वात जास्त उत्सूकता असते ती म्हणजे कंपनीकडून मिळणार्या दिवाळी गिफ्टची. सर्वच कंपन्या दिवाळीला कर्मचार्यांना खुष करण्यासाठी काहीना काही गिफ्ट देत असतात. यामध्ये मग ड्रायफ्रूट पॅक पासून एखाद्या होम अप्लायन्सेसपर्यंतचे हे गिफ्ट असतात. मात्र दिवाळीचे गिफ्ट म्हणून महागड्या कार, फ्लॅट अथवा हिर्यांची दागिने यांचे आहे मात्र सुरतच्या या हिर्याच्या कंपनीने आपल्या कर्मचार्यांना यंदाच्या दिवाळीत काहीसे असेच गिफ्ट दिले आहे. त्यामुळे या कर्मचार्यांची यंदा दिवाळी जोरातच आहे.
ज्या कर्मचार्यांना हे महागडे गिफ्ट देण्यात आले आहेत, ते या हिरा कंपनीमधील कारागिर आहेत. ढोलकीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारागिरांच्या कामाच्या दर्जामुळे कंपनीला मोठा फायदा झाला आहे. तसेच त्यांच्या नफ्यातही मोठी वाढ झाली आहे. यामुळेच कंपनीने त्यांच्या कामगिरीवर खुष होऊन 50 कोटींचे बजेट बनवले होते.