पुणे :
सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत राज्यसभेच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी मावळ तालुक्यातील दत्तक घेतलेल्या सुदुंबरे गावामध्ये संगणक केंद्र सुरू करण्यात आले आहे. या संगणक केंद्राचे उद्घाटन खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी झेन्सार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश नटराजन व त्यांचे सहकारी, तहसीलदार शरद पाटील, सरपंच सविता भंगे, लायन्स क्लबचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
‘झेन्सार कंपनी’ च्या वतीने या संगणक केंद्रात ग्रामस्थांना मोफत संगणक प्रशिक्षण घेता यावे आणि भविष्यात संगणक साक्षर गाव म्हणून गावाची ओळख व्हावी यासाठी अद्यावत सोयी व सुविधा आहेत. नॅशनल डिजिटल लिट्रसी मिशन यांच्या सहकार्याने हे संगणक कक्ष सुरू करण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थी याचा लाभ घेता येईल.
उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘भविष्यात सुदुंबरे गाव संगणक साक्षर गाव म्हणून ओळखले जावे यासाठी हे अद्यावत सोयी, सुविधांनी सुसज्ज असलेले संगणक केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि युवा वर्ग यांना मोफत संगणक प्रशिक्षण घेता येणार आहे. .’

