पुणे-शाळा सुरु होऊन १० दिवस झाले तरी पुणे मनपा शिक्षण मंडळा तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप झाले नव्हते,याबाबत आंदोलन उभारण्याचा इशारा भाजप चे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर,शिक्षण मंडळ सदस्य रघुनाथ गौडा,सौ.मंजुश्री खर्डेकर,किरण कांबळे,यांनी दिला होता.आज याबाबत शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी शिवाजीराव दौंडकर यांच्याशी संदीप खर्डेकर व रघुनाथ गौडा यांनी संपर्क साधला असता-बूट,वह्या,दप्तर,चित्रकला साहित्य व एक गणवेश यांची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असून २ जुलै पर्यंत त्याचे वाटप पूर्ण होईल असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच उर्वरित दुसरा गणवेश ही लवकरात लवकर देण्यात येईल असे ही ते म्हणाले.(प्रत्येक विद्यार्थ्यास दोन गणवेश दिले जातात)
प्रशासनाने आश्वासन पाळले नाही तर भाजप आंदोलन उभारेल असे भाजप चे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर,शिक्षण मंडळ सदस्य रघुनाथ गौडा,सौ.मंजुश्री खर्डेकर,किरण कांबळे,यांनी स्पष्ट केले आहे.

