मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना, प्रधान सचिव श्यामलाल गोयल, अवर सचिव र.ग. पांचाळ, माधव भंडारी आदी उपस्थित होते.

