पुणे : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सारसबागेत नृत्य-गीतांच्या बरसातीत दिवाळी पहाट रंगली. दिवाळीच्या उत्साहात सामाजिकतेची जाणीव ठेवून या वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई)च्या पुणे विभागाने या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बासरीवादक रोहित वनकर, व्हायोलिनवादक तेजस उपाध्ये व तबलावादक मिलिंद उपाध्ये यांच्या जुगलबंदीला भैरवी रागाने प्रारंभ झाला. प्रसिद्ध कथक कलावंत मनीषा साठे यांच्या शिष्या शांभवी देशपांडे आणि त्यांच्या सहकारी कलावंतांनी वर्षाऋतूवर आधारित नृत्याविष्कार सादर केला. तेजस्विनी साठे दिग्दर्शित आणि विक्रम घोष यांच्या संगीतावर आधारित फ्युजनवर नेहा कर्वे, शर्वरी भिडे, भक्ती झळकी व ऐश्वर्यासाने या कलावंतांनी सादर केलेल्या कथक नृत्याने रसिकांची मने जिंकून घेतली.
प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरूक व त्यांच्या सहकार्यांनी रसिकांना ‘गीतों का सफर’चा अनुभव दिला. विजय कुलकर्णी, माधवी देसाई, सौरभ सांळुके, अली हुसेन, धनश्री गणात्ना, जितेंद्र भुरुक यांनी गाणी सादर केली.
शांतिलाल सुरतवाला यांनी प्रास्ताविक केले. महापौर दत्ता धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित निंबाळकर, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, माजी नगरसेवक गोपाळ चिंतल उपस्थित होते. मोनिका जोशी यांनी सूत्नसंचालन केले. आनंदऋषीजी ब्लडबँकेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरांत १५२ दात्यांनी रक्तदान के