पुणे लष्कर भागात नवा मोदीखाना भागात सर्व धर्मीय नागरिकांच्या सहभागाने सामुदायिक तुळशी विवाह थाटामाटात संपन्न झाला . पारंपारिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला . यावेळी तुळशीचा विवाहासाठी खाण्या मारुती मंदिराचे प्रविण महाराज यांनी मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराना तोरण लावून विद्यत रोषणाईची सजावट करण्यात आली होती. त्यांनतर पुरोहिताकरवी गणपती आणि मातृका पूजा करण्यात आली . यानंतर लक्ष्मी नारायणाची मूर्ती आणि तुळशीपत्रासोबत सोने आणि चांदीची तुळस आसनावर ठेवण्यात आली होती . त्यांनतर गोरज मुहूर्तावर देवाचे (वराचे ) पूजन करण्यात आले . मंत्रोच्चारासहित कन्येस ( तुळशीस ) दान करण्यात आले . यानंतर हवन आणि अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करण्यात आली . नंतर वस्त्रे आणि आभूषणे घालण्यात आली . शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावण्यात आला . यावेळी ” शुभमंगल सावधान ” चे सूर घुमले . यावेळी झेंडूंच्या माळांनी सजावट करण्यात आली होती . यावेळी मंगलाष्टका प्रविण महाराज यांनी गायली .
या सामुदायिक तुळशी विवाहामध्ये रुक्मिणी यादव , शोभा यादव , शारदा यादव , रंजना यादव , सोनाली भिंगवाड , कमल प्यारम , रतन गाडेकर , सुरेखा गाडेकर , मनकरना पुरम , नीता बंकेवार , लक्ष्मी यादव , कांचन कांबळे , छाया तांबे , अपर्णा कदम या प्रमुख महिलांनी मार्गदर्शनाखाली सामुदायिक तुळशी विवाह थाटामाटात संपन्न झाला . या विवाह सोहळ्यासाठी शशीधर पूरम , मोहनीश यादव , दिलीप प्यारम , राहुल यादव , सागर रैन्नक , विनोद यादव , दुर्गेश यादव , राजू लिंगवत यांनी विशेष परिश्रम घेतले . सर्वांनी शेवटी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला .