आता संपूर्ण बहुमताचे सरकार चालविण्याची संधी केंद्रात भाजपला मिळाली आहे; तरीही सामान्य माणसाच्या थेट घरापर्यंत काय पोहोचले आहे ? सध्या केंद्रात असलेल्या सरकारने कोणते आश्वासन पूर्ण केले ?.महागाई , भ्रष्टाचार , बेरोजगारी यावर सारेच बोलतात पण काँग्रेस ने प्रत्यक्ष काम केले , भ्रष्टाचार प्रकरणी प्रसंगी आपल्या माणसांची हि गय काँग्रेस ने केली नाही . सर्व जाती धर्मांना बरोबर घेवून जाणारा काँग्रेस हाच पक्ष आहे ज्याला गांधी घराण्याच्या बलिदानाची परंपरा आहे . देशासाठी बलिदान देणाऱ्या , स्वातंत्र्य चळवळीतला हा पक्ष आहे पंतप्रधानपदाच्या खुर्चीचाहि प्रसंगी त्याग केलेला हा पक्ष आहे; इथे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी खेचाखेची नाही . गेल्या काही वर्षात इतर राजकीय पक्षांना बरोबर घेवून आघाडी करीत काँग्रेस ने देशाची हि सत्ता चालविली त्यावेळी इतर पक्षांनी वेळोवेळी अडचणी निर्माण केल्या . आता जनतेने बहुमताने राज्यात काँग्रेस ला निवडून द्यावे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण सारखे नेतृत्व या राज्याचे कसे सोने करेल हे दिसून येईल असे प्रतिपादन आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी येथे केले
आज प्रचारा दरम्यान त्यांनी आपल्या मतदारांशी संवाद साधला , ते म्हणाले , ‘ राज्यात काँग्रेस ला पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमताने जनतेने सत्ता प्रस्थापित करण्याची संधी द्यावी म्हणजे काँग्रेस आम जनतेसाठी काय करू शकते हे स्पष्ट दिसेल . जनतेला संभ्रमात पाडायची कामे विरोधी पक्ष करीत आहे. केंद्रात संपूर्ण बहुमताने भाजपचे सरकार आहे. पण तरीही थेट सामान्य माणसाच्या घरापर्यंत अजूनही काही पोहोचलेले नाही , केंद्रातल्या सरकारने प्रांता – प्रांतात , माणसा -माणसात दरी निर्माण करून जनतेच्या मूळ पक्षांकडे दुर्लक्ष करू नये म्हणून त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी देखील राज्यात काँग्रेस च्या बहुमताचे सरकार येणे गरजेचे आहे . माझ्या मतदार संघातील सामान्य – मध्यमवर्गीय माणसाला शांततेने , समाधानाने, आनंदी जीवन कसे व्यतीत करता येईल याकडे आपल्या विकासकामांचा कल राहील . वर्षानुवर्षे माझी येथील सामान्य जनतेशी थेट नाळ जोडली गेली आहे असेहि ते म्हणाले