मुंबई : सांस्कृतिक विभाग आणि मी मुलुंडकर सांस्कृतिक कार्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ढोल ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा दिनांक 19 डिसेंबर 2015 ते 3 जानेवारी 2016 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा विभागीय (प्राथमिक) आणि राज्यस्तरीय (अंतिम) अशा दोन टप्प्यात होणार आहे. औरंगाबाद विभाग- 19 डिसेंबर 2015, पुणे विभाग – 25 डिसेंबर 2015, नाशिक विभाग- 26 डिसेंबर 2015, कोकण विभाग, पनवेल- 27 डिसेंबर 2015, नागपूर विभाग – 2 जानेवारी 2016 आणि अमरावती विभाग – 3 जानेवारी 2016 रोजी होणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी 12 जानेवारी 2016 रोजी रायगड महोत्सवाच्या सांगता समारोहाच्या वेळी रायगड किल्ल्याच्या पायथ्यापाशी होणार आहे.
इच्छुक ढोल ताशा पथकांनी राहुल बाणावली यांच्याशी 9004765000 या मोबाईल क्रंमाकावर संपर्क साधावा तसेच मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

