नवी दिल्ली, दि.१६- बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज शून्यकाल प्रहरात सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी अधिकचा निधी केंद्राने उपलब्ध करून द्यावा असा मुद्दा उपस्थित केला.
केंद्र सरकारने नव्याने सुरु केलेली सांसद आदर्श ग्राम योजना ही अतिशय चांगली आणि ग्रामविकासाला चालना देणारी आहे. केंद्राने यासाठी जो निधी उपलब्ध करून दिला आहे. तो वाढवून दिला तर ही योजना अधिक चांगल्या रीतीने राबविता येईल. ही संकल्पना अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलल्यास ही योजना यशस्वी होण्यास अधिकच मदत होणार आहे. अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली. आज प्रत्येक गाव आदर्श ग्राम योजनेत सहभागी होण्यास उत्सुक आहे, दरवर्षी या योजनेचा आढावा घेत असतांना या गोष्टी केंद्राने विचारात घ्याव्यात असेही त्या म्हणाल्या.