प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी काश्मीरला भेट द्यायलाच हवी,’-सलमान खान
(पहा सलमान खान ची काश्मीर मधील छायाचित्रे)
– भारत , सलमान खान आणि सिनेमा ला अंद्रबीने म्हटले राक्षस …
श्रीनगर-काश्मीर मध्ये बजरंगी भाई जान च्या चित्रीकरणाला गेलेल्या सलमान खान ला तेथेही आपल्या चाहत्यांच्या उत्सुकतेचा जसा आनंद घेता आला तसाच आपल्या विरोधात काहींनी ओकलेली गरळ ही -ऐकावी लागली सिलेब्रटी होण्याच्या आणि विचारलेल्या प्रश्नांवर साधे सरळ उत्तरे देण्याच्या प्रकारानेही तेथील दुखतरेन-ए-मिलातची प्रमुख असिया अंद्रबी सलमान सह भारता विरुध्द हि बरळली आहेदरम्यान , ‘ज्यानं काश्मीर पाहिलं नाही, त्यानं काहीच पाहिलं नाही. काश्मीर हे पृथ्वीवरचं सगळ्यात सुंदर ठिकाण आहे. प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी काश्मीरला भेट द्यायलाच हवी,’ असं मत अभिनेता सलमान खान यानं व्यक्त केलंय.’हिट अँड रन’ प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर सलमान ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या शुटिंगासाठी काश्मीरमध्ये गेला होता. तेथील शुटिंग संपवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सलमाननं काश्मीरच्या सौंदर्यावर तोंडभरून कौतुक केलं. ‘निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी स्वित्झर्लँडला जाणारे मूर्ख आहेत. निसर्गानं काश्मीरला भरभरून दान दिलं आहे. स्वित्झर्लंडची काश्मीरशी तुलना होऊ शकत नाही,’ असं सलमान म्हणाला.’काश्मिरी माणसं खूपच सभ्य, सुसंस्कृत, साधीभोळी व सुंदर आहेत. काश्मीरमध्ये ४० दिवस राहून मी याचा अनुभव घेतलाय. काश्मीरच्या मी प्रेमातच पडलोय. इतरांनीही या ठिकाणाला भेट द्यावी,’ असं आवाहनही त्यानं केलं. काश्मीरमधील सिनेमागृह पुन्हा सुरू व्हायला हवीत. तसं झाल्यास आम्ही चित्रपटांचे प्रिमीअर सोहळे इथं करू,’ असंही तो म्हणाला.
तर दुसरीकडे……..
‘सिनेमांद्वारे भारत काश्मीरमध्ये अनैतिक आणि इस्लामविरोधी कट रचत आहे आणि खुनी असलेल्या सलमान खान सारख्या एजंटच्या माध्यमातून भारताचे हे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही काश्मीरमध्ये कोणत्याही परिस्थितीत सिनेमागृहे उघडू देणार नाही’, असं महिला फुटीरतावादी संघटनेची प्रमुख आणि दुखतरेन-ए-मिलातची प्रमुख असिया अंद्रबीनेम्हटले आहे .
काश्मीरमधील चित्रपटगृह पुन्हा सुरू झाली पाहिजेत, असं म्हटल्याने अभिनेता सलमान खानला फुटीरतावाद्यांनी टार्गेट केलंय. ‘सलमान खान हा खुनी आहे’, असा हल्लाबोल दुखतरेन-ए-मिलातची प्रमुख असिया अंद्रबीने केली आहे.
चित्रपट हा राक्षस आहे आणि तो समाजात चंगळवाद पसरवतो. त्यामुळे काश्मीरमध्ये आम्ही कदापि सिनेमागृह पुन्हा उघडू देणार नाही. भारताच्या सांस्कृतिक अतिक्रमणाला काश्मीरमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी सलमान खान हा भारतीय एजंट असल्यासारखा बोलतोय, असं असिया अंद्रबीने सांगितलं.
‘सिनेमांद्वारे भारत काश्मीरमध्ये अनैतिक आणि इस्लामविरोधी कट रचत आहे आणि सलमानसारख्या एजंटच्या माध्यमातून भारताचे हे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही काश्मीरमध्ये कोणत्याही परिस्थितीत सिनेमागृहे उघडू देणार नाही’, असं अंद्रबीने ठणकावलं.
‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या शुटींगसाठी गेलेल्या सलमान खानला काश्मीरमध्ये चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गेल्या रविवारी सलमानने काश्मीरमधील चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याचं वक्तव्य केलं होतं. चित्रपटांची आवड असल्याने अनेक जण टीव्ही किंवा पायरेटेड सीडीद्वारे सिनेमे बघतात. पण चित्रपटगृहे सुरू झाल्यास हे थांबेल आणि सर्वांना सहज सिनेमे बघता येतील, असं सलमान म्हणाला होता.
दुखतरेन-ए-मिलात ही कट्टर महिलांची फुटीरतावादी संघटना सिनेमागृहे, ब्युटी पार्लर, वाइन शॉप आणि व्हिडिओ पार्लरच्याविरोधात आहे. या संघटनेने १९९० पासून काश्मीर खोऱ्यातील चित्रपटगृहे बंद पाडली आहेत. तेव्हापासून काश्मीरमधील चित्रपटगृहे बंदच आहेत.