मुंबई – सलमान खानने अर्पिताचे लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक सोडली नाही. १८नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथील प्रसिद्ध फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिता आणि आयुषचा शाही लग्नसोहळा पार पडला. आज २१ नोव्हेंबर रोजी मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.
लग्नाच्या निमित्ताने सलमानने अर्पिताला मुंबईत १६ कोटींचा ३ BHK फ्लॅट गिफ्ट केला आहे. हा टेरेस फ्लॅट सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटपासून केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. सलमानने आपल्या या लाडक्या बहिणीला फ्लॅटसोबतच आणखी एक महागडी भेटवस्तू दिली आहे. त्याने अर्पिताला रोल्स रॉयस कार भेट म्हणून दिली आहे.
पांढ-या रंगाच्या रोल्स रॉयस फँटम या कारची किंमत भारतात जवळजवळ चार कोटींच्या घरात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान लग्नात खूप भावूक झाला होता. अर्पिता आणि आयुषला आशीर्वाद देताना त्याने दोघांना कारची चावी गिफ्ट केली.