क्रिटिक रेटिंग- 4.5/5
कलाकार -रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा…
दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी
निर्माता -संजय लीला भन्साळी
संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी
जॉनर- ऐतिहासिक प्रेमकथा
सर्वांनी आवर्जून पाहावा असा .. द ग्रेट…’ बाजीराव मस्तानी ‘
खरे तर,सलमान खान आणि ऐश्वर्या रोय यांना घेवून बाजीराव मस्तानी करू पाहणाऱ्या संजय लीला भन्साळींनी त्यांच्याखेरीज जरी हा सिनेमा केला असला ; या सिनेमाला कितीही कुणाचाही विरोध होत असला तरीही … … पण या सिनेमाची कलाकृती पाहून त्यामागील कष्ट अपार मेहनत पाहून संजय लीला भन्साळी यांना ही ग्रेट म्हणावेच लागेल असा हा सिनेमा आहे. प्रत्येकाने आवर्जून पाहावा आणि त्यानंतर तो जसा बाजीराव ला ग्रेट म्हणेल , तसा काशिबाईला ही म्हणेल आणि मस्तानीला हि ग्रेट म्हणेल …. पण त्याबरोबर तो हा सिनेमा काढणाऱ्या भन्साळी यांनाही ग्रेट म्हटल्यावाचून राहणार नाही .
रणवीर, दीपिका आणि प्रियांका यांच्या सह महेश मांजरेकर , वैभव तत्ववादी , मिलिंद सोमण,सुखदा अभिजित खांडकेकर अनुजा सौरभ गोखले , गणेश यादव , आदित्य पांचोली, रझा मुराद, तन्वी आजमी आदींच्या चोख भूमिका आहेत. रणवीर ने मोठ्या ताकदीने बाजीराव साकारला आहे तर वैभव ने चिमाजी हि छान साकारला आहे मांजरेकर छत्रपतींच्या भूमिकेत आहेत .
मिलिंद सोमण (पेशवाच्या सल्लागाराच्या भूमिकेत) आणि तन्वी आजमी (बाजीराव यांची आई राधाबाई यांच्या भूमिकेत) यांनी आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.
बाजीरावांच्या दोन बहिणी अनुबाई आणि भिऊबाई ह्यांच्या भुमिकेत दोन मराठी अभिनेत्री दिसल्या आहेत. भिऊबाई बनलीय, अभिनेत्री अनुजा साठे तर अनुबाई बनलीय अभिनेत्री सुखदा खांडकेकर . यांनीदेखील आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. तसेच सहायक भूमिकेत, मराठी अभिनेता वैभव तत्वावादी रणवीर सिंगच्या लहानभावाची म्हणजे चिमाजी अप्पांच्या भूमिकेत आहेत. तसेच मराठी अभिनेते महेश मांजरेकर यांनीदेखील सिनेमात छत्रपतीची भूमिका साकारली असून तिला न्याय दिला आहे. या सिनेमात अनेक मराठी कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळतील.
प्रकाश कापडिया यांचे संवाद भन्नाट आहेत . आणि संवादा चे सादरीकरण हि भन्नाट आहे . गणपतीची आरती चालू असताना (दीपिकाच्या )मस्तानीच्या खुनाचा कट … (प्रियांका चोप्रा )काशीबाईकडूनच उधळून लावला जाणे आणि खुद्द ‘पिंगा ग पोरी पिंगा ‘ हे गाणे जरी सिनेमा रंगतदार व्हावा म्हणून घेतले असले तरी–यासाठी हळदी कुंकवाला मस्तानीला निमंत्रण द्यायला जाणे , नानासाहेब पेशव्यांच्या कैदेतून मस्तानीची सुटका होण्यासाठी खुद्द काशीबाईंनीच प्रयत्न करणे अशा कितीतरी गोष्टींनी काशीबाई यांची महती देखील हा सिनेमा दाखवून जातो . तर रणभूमीवर धडाकेबाज झुंज देत विजय मिळविणारा तडाखेबाज बाजीराव हा योध्दा; धर्म मार्तण्ड आणि त्यात अडकून पडलेल्या परिवारात मात्र हतबल होवून जीवनाची लढाई हरतो हेच यातून दिसून आले आहे .३०० वर्षापूर्वीही जातीयवाद-धर्मभेद न मानणारा बाजीराव होवून गेला . त्याची हि प्रेमकहाणी अद्वितीय अशीच आहे हे सांगण्यात हा चित्रपट यशस्वी होतो .मस्तानीचे लग्न, मस्तानीचे झालेले हाल , आणि मस्तानीचे प्रेम आणि प्रत्यक्षात रणांगणावरचे शौर्य हे सारे दीपिकाने अतिशय सुरेख पणे साकारले आहे.